TRENDING:

IND vs SA : 'अभिषेक-तिलकला संघातून काढतो आणि संजूला…', सूर्याने कुणाची फिरकी घेतली, VIDEO

Last Updated:

साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी सूर्याची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत त्याने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनसह टीम कॉम्बिनेशन भाष्य केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs South Africa Suryakumar Yadav Press conference : टीम इंडियाचा सूपर 8 मधला पहिला सामना हा साऊथ आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर संध्याकाळच्या सूमारास खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी कॅप्टन सूर्यकुमार यादवची पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत त्याने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनसह टीम कॉम्बिनेशन भाष्य केले आहे. त्यात एकवेळ अशी आली होती ज्यावेळी सूर्याला अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माला काढून टाकून संजूला संधी देण्यास सांगितले होते. त्यानंतर सूर्याचे जे बोलला त्याने सगळ्यांचीच बोलती बंद केली होती. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
surya kumar yadav
surya kumar yadav
advertisement

साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी सूर्याची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत सूर्याला एका पत्रकाराने विचारले, आम्ही संजू सॅमसनला सूपर 8 मध्ये खेळताना पाहू शकतो. कारण त्याने मैदानात काल खूप वेळ सराव केला होता. यावर सूर्या म्हणाला, तुमच्या मते मी अभिशेक शर्माच्या जागी त्याला खेळवू...पण पत्रकार नाही म्हणतो आणि नंबर 3 वर खेळवा असे सूचवतो..यावर सूर्या म्हणतो, म्हणजे तिलक वर्माच्या जागी खेळवू असे म्हणत सूर्या हसायला लागतो.

advertisement

advertisement

सगळं चांगलं तर चाललं आहे. पॉवरप्लेमध्ये 40-50 धावा तर होतायत. हे नॉर्मल क्रिकेट आहे. पण आता आम्ही बायलेटरल सीरीज इतक्या खेळल्या आहेत, त्यामुळे अपेक्षा असतात. आमच्या देखील अपेक्षा आहेत. 220, 240, 250 धावा करू पण विकेटस वेगळे आहेत.आम्ही ज्या चार विकेटवर आतापर्यंत जे खेळलो आहे, हे थोडं चांगल आणि आव्हानात्मक होतं. ऑफ स्पिनर आधी कुणी टाकायचं नाही पण आता सगळे टाकतायत.त्यामुळे यासाठी आम्ही तयारी सूरू केली आहे. अपेक्षा आहे की आम्ही सूपर 8 मध्ये सगळे सामने जिंकू असे देखील सूर्या म्हणाला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षांवर वाढला भुरीचा प्रादुर्भाव? वेळीच करा रोग व्यवस्थापन, तज्ज्ञांचा सल्ला
सर्व पहा

दरम्यान सूर्याच्या सध्याच्या तरी बोलण्यावरून संजू सॅमसनला संधी मिळणार नाही आहे. त्याला बेंचवरच बसावं लागणार आहे.त्याच्यासोबत अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माला संधी मिळणार आहे, हे नक्की झालं आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : 'अभिषेक-तिलकला संघातून काढतो आणि संजूला…', सूर्याने कुणाची फिरकी घेतली, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल