आयसीसीचा 'प्री-सीडिंग' नियम
आयसीसीने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 'प्री-सीडिंग' हा वेगळा नियम लागू केला आहे. या नियमामुळे सर्वांनाच चक्रावून टाकलं आहे. या नियमानुसार ग्रुप स्टेजमध्ये पहिल्या क्रमांकावर राहूनही टीम्सचे स्थान रँकिंगवर अवलंबून असते म्हणजेच ग्रुप स्टेजमधील चारही गटाच्या पहिल्या टीम एका गटात आणि दुसऱ्या क्रमांकाच्या टीम दुसऱ्या गटात असा नियम आयसीसीने लागू केला होता. त्यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. यावरच सूर्यकुमार यादवने नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
मी हा नियम बदलण्याचा प्रयत्न करेन - सूर्या
ऑस्ट्रेलियाचा स्पिनर ॲडम झॅम्पा यानेदेखील यापूर्वी या नियमावर कडाडून टीका केली होती, ज्याला आता भारतीय कॅप्टनने साथ दिली आहे. सूर्यकुमार भर प्रेस कॉन्फरेन्समध्ये हा मुद्दा उपस्थित केला. अशा प्रकारचे निर्णय नेमके कोण घेते, हे मला माहित नाही. रँकिंगच्या आधारावर सुपर-8 चे गट ठरवणे खेळातून स्पर्धात्मकता कमी करू शकते. रँकिंगपेक्षा मैदानावरील सद्य कामगिरीला महत्त्व मिळणे आवश्यक असल्याचं सूर्याने म्हटलं आहे. तसेच जर कधी मला अशा निर्णय प्रक्रियेत स्थान मिळाले, तर मी हा नियम नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करेन, असंही सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शिवम दुबे, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती.
दक्षिण अफ्रीकेची संभाव्य प्लेईंग इलेव्हन: क्विंटन डि कॉक, एडन मार्करम (कॅप्टन), रयान रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, डेविड मिलर, मार्को जानसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कगिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.
