advertisement

Pakistan Semifinal Scenario : पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? असं झालं तर चमत्कारच घडेल! पाहा कारण काय?

Last Updated:

Pakistan T20 World cup Semifinal Scenario : न्यूझीलंडच्या हक्काचा एक पाईंट पाकिस्तानला मिळालाय खरा पण पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचणं खूपच कठीण असणार आहे. याची एक नाही तर दोन दोन कारणं आहेत.

Pakistan T20 World cup Semifinal Scenario
Pakistan T20 World cup Semifinal Scenario
Pakistan T20 WC Semifinal Scenario : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर 8 स्टेजला आता सुरूवात झाली आहे. सुपर 8 चा पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार होता. मात्र, पावसाने हजेरी लावली आणि पाकिस्तानला एक पाईंट्स कमावण्याची संधी मिळाली. दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले असून आता पाकिस्तानसाठी मोठी डोकेदुखी समोर आली आहे. न्यूझीलंडच्या हक्काचा एक पाईंट पाकिस्तानला मिळालाय खरा पण पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचणं खूपच कठीण असणार आहे. याची एक नाही तर दोन दोन कारणं आहेत.

आगामी सामने श्रीलंकेच्या कँडीच्या मैदानावर

श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियमवर पावसाने हजेरी लावल्याने पाकिस्तानला मोठं नुकसान झालं. त्यांना स्पिनर्स फ्रेंडली पीचवरून फक्त एकच पाईंट कमवता आला. पाकिस्तानकडे ही एकच संधी होती, ज्यामध्ये त्यांना मोठी उडी घेता आली असती. आता पाकिस्तान आगामी सामने टफ असणार आहेत. पाकिस्तानचे आगामी सामने श्रीलंकेच्या कँडीच्या मैदानावर असणार आहे. इथलं पीच पाटा असल्याने इथं पाकिस्तानच्या स्पिनर्सला काहीही मदत मिळणार नाही.
advertisement

पाकिस्तानच्या फास्टर्स बॉलर्सची परीक्षा

कँडीच्या मैदानात स्पिनर्सला काहीही फायदा होत नाही तर बॅटर्ससाठी हे पीच फायद्याचं ठरतं. अशातच आता पाकिस्तानच्या फास्टर्स बॉलर्सची तर वाट लागली आहे. पाकिस्तानचा प्रिमियम बॉलर शाहीन शाह आफ्रिदी फॉर्ममध्ये नसल्याने पाकिस्तानला मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय. आता नव्या बॉलर्सच्या भरोशावर पाकिस्तानला मैदानात उतरावं लागेल.
advertisement

पाकिस्तानचे आगामी सामने

दरम्यान, पाकिस्तानला जर सेमीफायनलमध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना कमीतकमी 5 ते 6 पाईंट्स हवे आहेत. अशातच आता पाकिस्तानला उर्वरित 2 पैकी दोन्ही मॅच जिंकाव्या लागतील.पाकिस्तानचा पुढील सामना 24 फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध असेल, तर न्यूझीलंडचा पुढील सामना 25 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध असेल. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडचा सामना इंग्लंडशी होईल आणि 28 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेचा सामना पाकिस्तानशी होईल. त्यामुळे आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pakistan Semifinal Scenario : पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? असं झालं तर चमत्कारच घडेल! पाहा कारण काय?
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement