खरं तर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हायरल व्हिडिओमध्ये स्टेडिअममध्ये मॅच बघायला आलेला एक पठ्ठ्याने शुभमन गिलच्या वडिलांना पाहून थेट विचारतो. शुभमन गिल लग्न कधी करणार आहे? यावर त्याचे वडील म्हणतात मलाच माहिती नाही.त्यालाच माहिती तो कधी करणार आहे.त्यानंतर पठ्ठ्या फुल डेअरींग करून त्यांना विचारतो, सारा मॅडम सोबत गिल लग्न करणार का? यावर हाताने नकार देतात. पण हा नकार त्यांचा फॅन्सच्या प्रश्नाला असतो.त्यानंतर ते असं नाही विचारायचं म्हणत प्रश्न टाळतात आणि निराश होतात.
advertisement
एका सामन्या दरम्यान ही घटना घडली आहे. हा सामना कोणता होता याची कल्पना नाही आहे. पण हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.क्रिकेट टाईम इष्क या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.
शुभमन गिल आयसीयूमध्ये
कोलकाता कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिल वुडलँड्स रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला खबरदारीचा उपाय म्हणून अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले. त्याचे स्कॅनिंग आणि संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुभमन गिलबाबत एक मोठी माहिती दिली आहे.
बीसीसीआयने म्हटले आहे की, "कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाली. दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर त्याला मूल्यांकनासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तो सध्या रुग्णालयात आहे आणि त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे. तो सामन्यात पुढे भाग घेऊ शकणार नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याचे निरीक्षण करत राहील,असे बीसीसीआयने सांगितले होते.
