शनाकाचं टायमिंग चुकलं अन् मॅच गमावली
मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये श्रीलंकेला विजयासाठी 12 धावांची गरज होती. कर्णधार सूर्यकुमार यादवने युवा बॉलर हर्षित राणाकडे बॉल सोपवला. राणाने पहिलीच बॉल पथुम निसंकाला टाकली आणि सेट बॅटर असलेल्या निसंकाला (107) आउट करत भारताच्या विजयाच्या आशा वाढवल्या. जैनिथ लियानागेने 2 धावा घेतल्या. लियानागेने 1 रन घेतला (अंपायरने 'बाय' म्हणून काउंट केला). श्रीलंकेला आता 3 बॉलमध्ये 9 धावांची गरज होती. दासुन शनाकाने धाव घेत 2 रन पूर्ण केले. शनाकाने महत्त्वाचा फोर मारला. श्रीलंकेला विजयासाठी 3 धावांची गरज होती. शनाकाने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण टायमिंग चुकलं अन् इथंच टीम इंडियाने दोन मोठ्या चुका केल्या.
advertisement
अक्षर पटेलची मोठी चूक
शनाकाने धाव पूर्ण केली असताना बॉल अक्षर पटेलकडे गेला, पण अक्षरने बॉल अचूक जज न केल्याने तो त्याच्या हातून सुटला. फिल्डिंगचा बादशाह असलेल्या अक्षरला बॉल कलेक्ट करून थ्रो करता आला नाही. तर त्यानंतर अक्षरने फेकलेला बॉल बॉलर हर्षित राणाला देखील नीट कलेक्ट करू शकला नाही. या चुकांमुळे श्रीलंकेच्या बॅटर्सनी दुसऱ्या धावेसाठी पळून एक रन पूर्ण केला आणि स्कोर टाय झाला. हीच चूक झाली नसती, तर भारत नॉर्मल ओव्हरमध्येच ही मॅच जिंकू शकला असता.
टीम इंडियाचा सहज विजय
दरम्यान, सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने फक्त दोन धावा केल्या. भारताकडून शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव बॅटिंगला आले. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने बॉलिंग केली. हसरंगाच्या पहिल्याच बॉलवर सूर्यकुमार यादवने 3 धावा घेत टीम इंडियाला सहज विजय मिळवून दिला आणि अक्षर आणि राणा यांच्या चुकांवर पडदा टाकला.