श्रीलंकेला 203 धावांचं आव्हान
टीम इंडियाने 202 धावा करून श्रीलंकेला 203 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, श्रीलंकेला पथूम निसंकाच्या शतकीय खेळीच्या जोरावर 202 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर सामना सुपर 4 मध्ये गेला. अर्शदीप सिंग याच्या हातात बॉल दिला अन् अर्शदीपने या ओव्हरमध्ये फक्त दोन धावा दिल्या. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने पहिल्याच बॉलवर तीन धावा पळून काढल्या.
advertisement
सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?
सुपर ओव्हरमध्ये भारताचा बॉलर अर्शदीप सिंगने जबरदस्त बॉलिंग केली. त्याने फक्त 2 धावा देत श्रीलंकेचे 2 विकेट्स घेतले आणि भारतासमोर विजयासाठी फक्त 3 धावांचे लक्ष्य ठेवले. पहिल्यात बॉलवकर कमिंडू मेंडिस रन आऊट झाला. तर चौथ्या बॉलवर झालेल्या ड्रामानंतर पाचव्या बॉलवर श्रीलंकेला शनाका कॅच आऊट झाला. 3 धावांचा पाठलाग करताना कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्याच बॉलवर 3 धावा घेत भारताला विजय मिळवून दिला.
पाहा Video
टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना भारताने 5 विकेट्स गमावून 202 धावांचा मोठा स्कोर उभा केला. ओपनर अभिषेक शर्माने पुन्हा एकदा तुफानी बॅटिंग करत 31 बॉलमध्ये 8 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. अभिषेकला युवा बॅटर तिलक वर्माने नाबाद 49 धावा आणि संजू सॅमसनने 39 धावा करून चांगली साथ दिली. 203 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून ओपनर पथुम निसंकाने अविश्वसनीय बॅटिंग केली. त्याने आशिया कपमधील पहिले शतक झळकावत 58 बॉलमध्ये 7 फोर आणि 6 सिक्ससह 107 धावांची खेळी केली. त्याला कुसल परेराने 58 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांच्या 127 धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंका विजयाच्या जवळ पोहोचला होती.