17 वर्षीय विकेटकीपर-बॅटर कमलिनीने महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये मुंबई इंडियन्ससाठी 9 सामने खेळले आहेत, पण 19 वर्षीय वैष्णवीचा WPL लिलावात समावेश करण्यात आला नाही. गेल्या महिन्यात वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीममधील राधा यादव आणि उमा छेत्री यांच्या जागी कमलिनी आणि वैष्णवीने घेतली आहे.
कमलिनी आणि वैष्णवी व्यतिरिक्त, टीममध्ये सर्व परिचित नावे आहेत. हरमनप्रीत कौर टीमचे नेतृत्व करत आहे, तर स्मृती मानधना उपकर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनल सामन्यापूर्वी जखमी प्रतिका रावलच्या जागी टीममध्ये आलेली स्फोटक ओपनर शफाली वर्मा देखील टीमचा भाग आहे.
advertisement
9 जानेवारी रोजी नवी मुंबईत 2026 ची WPL सुरू होण्यापूर्वी भारत आणि श्रीलंका पाच सामन्यांची सीरिज खेळतील. डिसेंबरमध्ये भारतात होणारी भारत आणि बांगलादेश यांच्यातील मर्यादित ओव्हरची सीरिज पुढे ढकलण्यात आल्यानंतर गेल्या महिन्यात भारत-श्रीलंका टी-20 सीरिजची घोषणा करण्यात आली.
भारतीय टीम
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, ऋचा घोष, जी कमालिनी, श्री चरणी, वैष्णवी शर्मा
