कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती
रविंद्र जडेजाला व्हाईस कॅप्टन केल्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. टीममध्ये आपल्या नावापुढे ‘VC’ (उपकर्णधार) लिहिलेलं पाहून त्यालाही मोठं आश्चर्य वाटलं, असं जड्डूने सांगितलंय. बीसीसीआयने मला सन्मान दिला. कर्णधार, कोच आणि मॅनेजमेंटने मला ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. टीमला कोणत्याही योजनेसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी माझी जेव्हाही गरज असते, तेव्हा योगदान देण्यासाठी मी नेहमीच आनंदी असतो, असं जड्डू म्हणाला.
advertisement
नावापुढे VC लिहिलेलं पाहिलं अन्...
बीसीसीआयने किंवा शुभमन गिलने मला काही सांगितलं नाही. जेव्हा टीमची घोषणा झाली तेव्हा मी माझ्या नावापुढे VC लिहिलेलं पाहिलं. दिवसाच्या शेवटी, तुमच्याकडे जो काही अनुभव असतो, तो तुम्ही टीमसाठी शेअर करता, असं म्हणत त्याने व्हाईस कॅप्टन्सची महत्त्व अधोरेखित केलं.
आत्मविश्वास कायम ठेवेन
दरम्यान, एक खेळाडू म्हणून, मला आत्मविश्वास मिळतो. तुम्ही जेव्हाही इंग्लंडमध्ये कामगिरी करता, तेव्हा तुम्हाला तो आत्मविश्वास मिळतो. आशा आहे की, मी या मालिकेतही तो आत्मविश्वास कायम ठेवेन, काही रन करेन आणि काही विकेट्स घेईन, असंही रविंद्र जडेजा म्हणाला आहे.
85 टेस्ट मॅचचा अनुभवी जडेजा
दरम्यान, 85 टेस्ट मॅचचा अनुभवी जडेजा टीमच्या सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. उपकर्णधार असो वा नसो, खेळाच्या प्रत्येक परिस्थितीत त्याचं इनपुट टीमसाठी उपयुक्त ठरतं. इंग्लंड दौऱ्यानंतर जडेजाचं टीममधलं महत्त्व अधिक वाढलं आहे. अशातच आता जडेजाला उतरत्या काळात नावलौखिक मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.