TRENDING:

IND vs WI Test : '...तो पराभव आमच्यासाठी धडा', BCCI ला वाटते एका गोष्टीची भीती! आगरकरांनी शोधला विराट कोहलीचा वारसदार!

Last Updated:

Chief selector Ajit Agarkar On Sai Sudarshan : गेल्या वर्षी घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध झालेला 3-0 असा दारुण पराभव टीम इंडियासाठी एक मोठा 'धडा' होता आणि त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, असं बीसीसीआयला वाटतंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IND vs WI Test Squad : वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्याची मालिका खेळणार आहे. अशातच आता बीसीसीआयला एका गोष्टीची भीती वाटतीये. मागील नोव्हेंबर महिन्यात रोहित शर्माने जी चूक केली, ती चूक बीसीसीआयला पुन्हा करायची नाही, असं अजित आगरकर यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी अजित आगरकर यांनी विराट कोहलीचा वारसदार देखील शोधला आहे.
IND vs WI Test Squad Ajit Agarkar
IND vs WI Test Squad Ajit Agarkar
advertisement

न्यूझीलंडविरुद्धची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये

गेल्या वर्षी घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध झालेला 3-0 असा दारुण पराभव टीम इंडियासाठी एक मोठा 'धडा' होता आणि त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, हीच संपूर्ण टीमची भावना आहे, असं भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी स्पष्ट केलं आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी 2-टेस्ट सिरीजसाठी (IND vs WI Test Series) टीम इंडियाची घोषणा करताना आगरकर बोलत होते. ही सिरीज 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये सुरू होणार आहे.

advertisement

घरच्या मैदानावरच्या चारही टेस्ट महत्त्वाच्या 

अजित आगरकर म्हणाले, जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपमुळे (WTC) आता प्रत्येक टेस्ट मॅच खूप महत्त्वाची बनली आहे. न्यूझीलंडविरुद्ध आमची सिरीज खूपच वाईट झाली होती. कदाचित तो आमच्यासाठी एक 'वेक-अप कॉल' होता. आम्ही बऱ्याच काळापासून घरच्या मैदानावर खूप मजबूत आहोत. काही खराब रिझल्ट्स खूप दिवसांनी आले होते आणि आता आम्हाला ते विसरायचे आहेत. वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या घरच्या मैदानावरच्या या चारही टेस्ट मॅचेस खूप महत्त्वाच्या आहेत, असं अजित आगरकर म्हणाले.

advertisement

साई सुदर्शनला नंबर 3 चा स्लॉट

क्रिकेट हा एक गेम आहे, त्यामुळे काहीही शक्य आहे, पण न्यूझीलंडविरुद्ध जे झाले ते पुन्हा होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असं म्हणत त्यांनी साई सुदर्शन याच्यावर मोठं वक्तव्य केलं. टीम इंडियाने ज्या प्रमुख क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे, ते म्हणजे नंबर 3 चा स्लॉट. या जागेवर राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा या दोन महान खेळाडूंनी प्रदीर्घ काळ जबाबदारी सांभाळली होती. कॉम्बिनेशनमुळे नंबर 3 वर काही बदल करावे लागले होते. पण आता साईने खूप क्षमता दाखवली आहे. तो एक चांगला खेळाडू आहे, हे आम्हाला माहीत आहे. आशा आहे की, आता आम्ही त्याला एका विशिष्ट क्रमांकावर दीर्घकाळ संधी देऊ शकू, असं आगरकर म्हणाले आहेत.

advertisement

विराट कोहलीचा वारसदार शोधला

दरम्यान, विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर टीम भविष्याचा विचार करत असल्याने, नंबर 3 साठी एक दीर्घकालीन पर्याय शोधण्यास उत्सुक आहे. आणि सध्या हा शोध साई सुदर्शन (Sai Sudharsan) याच्यावर थांबला आहे. निवड समितीला आशा आहे की, तो त्यांच्या विश्वासाला पात्र ठरेल.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI Test : '...तो पराभव आमच्यासाठी धडा', BCCI ला वाटते एका गोष्टीची भीती! आगरकरांनी शोधला विराट कोहलीचा वारसदार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल