कुठं मोफत पाहता येईल सामना ?
इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनीलिव्ह अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. तुम्ही सोनीलिव्ह द्वारे तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर सामना पाहू शकता.
विजयाने टीम इंडियाचा श्रीगणेशा
पाकिस्तान शाहीन संघ रविवार, 16 नोव्हेंबर रोजी दोहा येथे इंडिया ए संघाशी भिडणार आहे. सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर असतील, ज्याने युएईविरुद्ध फक्त 42 बॉलमध्ये 144 धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत 15 सिक्स आणि 11 फोरचा समावेश होता.
advertisement
'इंडिया ए'चा संघ - वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, जितेश शर्मा (कॅप्टन), निहाल वढेरा, रमनदीप सिंह, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, विजयर कुमार वैश्याक, गुरजपनीत सिंह, सुयश शर्मा, यश ठाकुर, युधवीर सिंह चरक, अभिषेक पोरेल, नमन धीर आणि सूर्यांश शेंडगे.
पाकिस्तान ए संघ - यासिर खान, मोहम्मद नईम, मोहम्मद फैक, माझ सदाकत, गाजी घोरी (विकेटकीपर), इरफान खान (कॅप्टन), साद मसूद, मुबासिर खान, अबैद शाह, अहमद दानियाल, मोहम्मद सलमान, पृथ्वीकुमार माछी, हसनैन शाह, शुएब अल बलुशी, उबेद उल्ला आणि एमडी युसूफ.
