बांग्लादेशचे लागोपाठ दोन सामने
आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बांग्लादेश प्रमुख दावेदार होती. मात्र, बांगलादेशवर अन्याय झाल्याची टीका होत आहे. संघाला सलग दोन दिवस सामने खेळावे लागले. खेळाडू थकले होते आणि त्यांना पूर्ण ताकद देता आली नाही. फक्त एक दिवस आधी, बांगलादेश सुपर फोरमध्ये भारताविरुद्ध खेळला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी बांगलादेशला पाकिस्तानविरुद्ध उतरावं लागलं. तर दुसरीकडे पाकिस्तान दोन दिवसाचा ब्रेक घेऊन मैदानात उतरला होता. त्यामुळे आता आयसीसीवर मोठी टीका होत आहे.
advertisement
आयसीसीने घाट घातला होता का?
आयसीसीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल व्हावी, असं वाटत होतं का? असा सवाल विचारला जात आहे. दोन महिने आधीच, जुलैमध्ये वेळापत्रक प्रसिद्ध झालं होतं. याचा अर्थ असा की बांगलादेश सुपर फोरमध्ये सलग दोन दिवस सामने खेळेल हे दोन महिन्यांपूर्वीच निश्चित झाले होते. तसेच श्रीलंकेला देखील सलग दोन सामने खेळावे लागल्याने भारत आणि पाकिस्तानला मुभा दिली गेली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान फायनल होण्यासाठीच आयसीसीने घाट घातला होता का? असा सवाल विचारला जात आहे.
41 वर्षांनंतर फायनलमध्ये...
दरम्यान, भारत- पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याचा थरार दुबईतील दुबई क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. भारत- पाकिस्तान यांच्यात होणारा अंतिम सामना येत्या रविवारी 28 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान 41 वर्षांनंतर भारत- पाकिस्तान दोन्ही संघ पहिल्यांदाच आशिया चषकातील अंतिम फेरीत आमनेसामने येणार असल्याने आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.