India vs South Africa 2nd t20i : न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर स्टेडिअमवर साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची अवस्था बिकट झाली आहे. कारण टीम इंडियाचे दोन्ही ही सलामीवीर झटपट बाद झाले आहेत.त्याच्या पाठोपाठ टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव देखील बाद झाला आहे. त्यामुळे चाहते प्रचंड भडकले असून शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव संघाबाहेर करण्याची मागणी करतायत. त्याच्या बदल्यात दुसऱ्या दोन खेळाडूंना संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.
advertisement
खरं तर साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल सलामीला आले होते.यावेळी शुभमन गिल पहिल्याच बॉलवर म्हणजेच गोल्डन डकवर आऊट झाला आहे. त्याच्यानंतर अभिषेक डाव सावरले असे वाटत होते. पण त देखील 17 धावांवर बाद झाला होता.
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल मैदानात आला होता. यावेळी सूर्याकडून मोठी अपेक्षा होती. मात्र तो देखील अवघ्या 5 धावावर बाद झाला होता.त्याच्यानंतर चांगल्या लयीत असलेला अक्षर पटेल 21 वर बाद झाला होता.
दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल गेल्या अनेक सामन्यांपासून फ्लॉप ठरताय. गिल मागच्या 13 सामन्यात 20(9), 10(7), 5(8), 47(28), 29(19), 4(3), 12(10), 37*(20), 5(10), 15(12), 46(40), 29(16), 4(2) अशा धावा काढल्या होत्या. त्याची कामगिरी खूपच वाईट झाली आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादवची तर मागच्या 24 सामन्यांमध्ये बॅट तळपली नाही आहे. सुर्यकुमार यादव 20(10), 1(4), 39*(24), 1(5), 12(13), 5(11), 0(3), 47*(37), 7*(2), 2(3), 0(4), 14(7), 12(7), 0(3), 1(4), 4(9), 21(17), 75(35), 8(10), 29(14), 8(9), 26(12), 58(26), 12 (11) अशा धावा केल्या आहेत.
भारताचे हे दोन्ही खेळाडू सातत्याने फ्लॉप ठरतायत. त्यामुळेच शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादवला बाहेर काढा आणि त्यांच्या जागी संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाडला संधी द्या,अशी मागणी चाहते करत आहेत. पण गंभीर इतका कठोर निर्णय घेणार का?हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकिपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन : रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅनसेन, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.
