दुसरी धाव पूर्ण केली आणि जमिनीवर डाईव्ह मारला
शेवटच्या ओव्हरच्या शेवटचा बॉल दासुन शनाकाने लाँग-ऑनसाठी खेळला, जो अक्षर पटेलने उचलण्यासाठी वेळच घेतला नाही तर मिसफिल्डिंगही केली. पहिली धाव घेतल्यानंतर, दासुन शनाकाने दुसरी धाव पूर्ण केली आणि जमिनीवर डाईव्ह मारला. त्याचवेळी टीम इंडियाच्या फिल्डर्सने चूक केली. बॉलिंग एन्डवर असलेल्या हर्षित राणा याने देखील कॅच घेतला नाही अन् बॉल दुसऱ्या बाजूला गेला. त्यावेळी दोन्ही बॅटर्सने आरामात तिसरी धाव पूर्ण केली असती. पण शनाका दुसरी धाव घेतल्यावर थेट पीचवर झोपला. त्यामुळे तिसरी धाव घेता आली नाही.
advertisement
अक्षरने थ्रो वेळेवर केला असता तर...
दासुन शनाकाच्या या छोट्याशा चुकीमुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. जर तो लवकर उठला असता आणि मागे वळून पाहिले असते तर तिसरी धाव घेतली असती आणि श्रीलंका जिंकला असता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर टीम इंडियाच्या फिल्डर्सने देखील मोठी चूक केली. अक्षरने थ्रो वेळेवर केला असता तर मॅच सुपर ओव्हरमध्ये गेलीच नसती, असं देखील बोललं जात आहे.
सुपर ओव्हरमध्ये नाट्यमय घडामोडी
सुपर ओव्हरमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अर्शदीप सिंगच्या बॉलवर शनाकाला कॉट-बिहाइंड आउट देण्यात आले, पण त्याने त्वरित DRS घेतला. दरम्यान, संजू सॅमसनने थ्रो करून शनाकाला रन आउट केले. मात्र, अंपायर गाझी सोहेल यांनी टीम इंडियाला स्पष्ट केले की, पहिल्या निर्णयानुसार (आउट दिल्यामुळे) बॉल डेड झाला होता. त्यामुळे, DRS मध्ये शनाका 'नॉट आउट' ठरल्यावरही, रन आउट लागू झाला नाही. अशा प्रकारे एका विचित्र 'डेड बॉल' नियमामुळे शनाकाला जीवदान मिळालं.