आशिया कप २०२५ ची सांगता भारताच्या विजयाने झाली. पाकिस्तानला लोळवत भारताने आम्हीच आशियाचे किंग असल्याचं दाखवून दिलं. १४७ रन्सचं टार्गेट भारतीय संघाने तिलक वर्माच्या झुंझार खेळीच्या बळावर विजय मिळवला. भारताने पाकिस्तानवर ५ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. पण, भारताची सुरुवात ही खराब होती. अभिषेक शर्मा, शुममन गिल, कर्णधार सुर्या सुद्धा आऊट झाला. पण, तिलक वर्माने शेवटपर्यंत विजय खेचून आणला. शेवटच्या ओव्हरमध्ये १० रन्स हवे होते. हरिफ राऊफ बॉलिंगला होता. त्याने पहिला बॉल स्लो टाकला. त्यानंतर ५ रन्समध्ये १० रन्स हवे होते. तिलक वर्माने समोर खणखणीत सिक्स मारला, मग काय भारताचा विजय हा जवळपास निश्चित झाला. टीम आणि मैदानात आनंदाचं वातावरण पसरलं.
advertisement
कोच गौतम गंभीर इतक्यावेळ शांतपणे आणि प्रेशरमध्ये होते. जसं तिलकने सिक्स मारला, त्यांनी टेबलावर जोरात हात मारला आणि आम्ही जिंकलो, असंच सांगून टाकलं. नंतर पुढे तिलकने एक रनसाठी धाव घेतली आणि रिंकूने पहिल्याच बॉलवर चौकार लगावून विजय मिळवून दिला.
मैदानात एंट्री
विशेष म्हणजे, जेव्हा टीम इंडियाची परिस्थिती नाजूक होती. सलामीचे फलंदाज आऊट झाले होते, भारताच्या ४ विकेट पडल्या होत्या. तेव्हा टीम इंडिया दबावाखाली होती. मधला ब्रेक जेव्हा झाला होता तेव्हा कोच गौतम गंभीर मैदानात आला होता. त्यांनी तिलक वर्मा आणि शुभम दुबे या दोघांशी चर्चा केली. संयमाने खेळा, प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार, सिक्सर लावून रनरेट कमी करा, असाच सल्ला दिला असावा, कारण, त्यानंतर तिलक वर्मा आणि दुबेनं चौकार, सिक्सर लगावून टीमवरच प्रेशर कमी केलं.