TRENDING:

Yuzvendra Chahal Latest News: क्रिकेटपटू युजवेंद्र चहल? नव्हे इनकम टॅक्स ऑफिसर म्हणा, महिन्याला मिळतो इतका पगार

Last Updated:

Yuzvendra Chahal News: युजवेंद्र चहलच्या घटस्फोटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. अशात चहल प्राप्तिकर विभागात नोकरी करतो यावर चर्चा सुरू झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: पत्नी धनश्री वर्मा सोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या चर्चेत आहे. चहल आणि धनश्री यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याची चर्चा आहे. नात्यात आलेल्या या दुराव्याबद्दल दोघांनी अद्याप काहीही वक्तव्य केलेले नाही.
News18
News18
advertisement

मैदानावर चांगली कामगिरी करणारे असे अनेक क्रिकेटपटू आहे ज्यांना सरकारी नोकरी घेतले जाते. अशा खेळाडूंमध्ये महेंद्र सिंह धोनी (लेफ्टनंट कर्नल), जोगिंदर शर्मा (पोलिस Yuzvendra Chahal News: युजवेंद्र चहलच्या घटस्फोटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. अशात चहल प्राप्तिकर विभागात नोकरी करतो यावर चर्चा सुरू झाली आहे. दलात अधिकारी), केएल राहुल (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सहाय्यक व्यवस्थापक), सचिन तेंडुलकर (ग्रुप कॅप्टन) यांचा समावेश होते. याच यादीत युजवेंद्र चहल देखील समावेश आहे.

advertisement

युजवेंद्र चहल याची भारतीय प्राप्तिकर विभागात नोकरीला आहे. चहलची 2018 साली इनकम टॅक्स ऑफिसर या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. प्राप्तिकर विभागातील क्रीडा कोट्याअंतर्गत त्याच्या सध्याच्या ग्रेडनुसार चहला 44,900 ते  1,42,400 दरम्यान पगार आहे. त्यांची ही नियुक्ती 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर झाली.

आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा संसार मोडला? पत्नीचे फोटो डिलिट,अनफॉलो केले

advertisement

चहल एकूण संपत्ती 45 कोटी असल्याचे म्हटले जाते. क्रिकेटमधून मिळणारे उत्पन्न हेच त्याचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत आहे. चहलने २०१६ साली झिम्बाब्वे दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २२ डिसेंबर २०२० साली त्याने धनश्री वर्मासोबत विवाह केला होता.

पुणे पोलिसांना अजितदादांचा अल्टिमेटम; वेळेत हे प्रकार थांबवा, जमत नसेल तर..

advertisement

चहलने भारताकडून ७२ वनडेत १२१ विकेट घेतल्या आहेत. ज्यात दोन वेळा ५ विकेटचा समावेश आहे. ४२ धावात ६ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर ८० टी-२० सामन्यात त्याने ९६ विकेट घेतल्या आहेत. २५ धावात ६ विकेट ही त्याची टी-२० मधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

आयपीएल २०२५च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने त्याला १८ कोटी रुपयांना संघात घेतले होते. चहलने आयपीएल करिअरमध्ये १६० सामन्यात २०५ विकेट घेतल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Yuzvendra Chahal Latest News: क्रिकेटपटू युजवेंद्र चहल? नव्हे इनकम टॅक्स ऑफिसर म्हणा, महिन्याला मिळतो इतका पगार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल