जम्मू-काश्मिरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला अद्दल घडवली. पण रणभूमीनंतर आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानी टीम भारताला भिडली. पण भारताने पाकिस्तानवर ५ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. मात्र, टीम इंडियाला ट्रॉफी देण्यासाठी पाकिस्तान सरकारचे मंत्री आणि एसीसी प्रमुख मोहसीन नकवी आले होते
advertisement
पण भारतीय टीमने पाकिस्तानी मंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रेझेंटेशन सोहळा उशिराने सुरू झाला. पीटीआयनेही वृत्त दिलं आहे की, भारतीय टीमने पाकिस्तानी मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यात मोठा पेच निर्माण झाला. भारतीय टीम ही ड्रेसिंग रुमच्या बाहेर आलीच नाही. त्यामुळे आयोजनांना अखेर माघार घ्यावी लागली.
शेवटी एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झारुनी यांना भारतीय टीमला ट्रॉफी देण्यास आमंत्रित करण्यात आलं. त्यानंतर भारतीय संघाने यासाठी होकार दिला.
पंतप्रधान मोदी यांचं हटके ट्वीट
आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये हायहोल्टेज अंतिम सामना झाला. रोमहर्षक सामन्यात भारताने ५ गडी राखून विजय मिळवला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या विजयावर खास ट्वीट केलं. हॅशटॅक ऑपरेशन सिंदूर हे मैदानात सुद्धा सुरूच आहे. मैदानात सुद्धा तेच उत्तर मिळालं, भारताचा विजय झाला, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी भारतीय टीमचं अभिनंदन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हटके शुभेच्छा दिल्यानंतर सोशल मीडियावर एकच धुरळा उडाला. पाकिस्तानच्या टीमला आता ट्रोल केलं जात आहे. पाकिस्तानच्या टीमला अतिआत्मविश्वास चांगलाच नडला. भारतासोबत एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आता टीव्ही फुटणार हे नक्की आहे.