TRENDING:

CSK ने शोधली धोनीची रिप्लेसमेंट, IPL ची सगळ्यात मोठी डिल, दुबे का गायकवाड, कुणाचा बळी?

Last Updated:

आयपीएल 2026 च्या लिलावाआधी चेन्नई सुपरकिंग्सने धोनीची रिप्लेसमेंट शोधली आहे, पण यासाठी ऋतुराज गायकवाड किंवा शिवम दुबेचा बळी जाण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएल 2026 साठीचा लिलाव डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पार पडण्याची शक्यता आहे, त्याआधी सर्व 10 टीमना त्यांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची माहिती द्यावी लागणार आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत टीमना ही यादी द्यावी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे, त्यातच आता संजू सॅमसनच्या ट्रेडविषयी मोठी माहिती समोर आली आहे. संजू सॅमसनच्या ट्रे़ड विषयी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पुन्हा एकदा चर्चेला सुरूवात झाली आहे, असं वृत्त क्रिकबझने दिलं आहे.
CSK ने शोधली धोनीची रिप्लेसमेंट, IPL ची सगळ्यात मोठी डिल, दुबे का गायकवाड, कुणाचा बळी?
CSK ने शोधली धोनीची रिप्लेसमेंट, IPL ची सगळ्यात मोठी डिल, दुबे का गायकवाड, कुणाचा बळी?
advertisement

संजू सॅमसनच्या बदल्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा मोठा खेळाडू मागितला आहे. चेन्नई सुपरकिंग्सच्या या खेळाडूसोबतही संभाव्य ट्रेड डिलबद्दल बोलणी सुरू आहेत, तसंच राजस्थान रॉयल्ससोबत खेळण्यात तू कम्फर्टेबल आहेस का? असंही सीएसकेच्या दिग्गज खेळाडूला विचारण्यात आलं आहे, असंही या वृत्तात सांगण्यात आलं आहे. येत्या काही दिवसात राजस्थान आणि सीएसके यांच्यातलं हे डील फिक्स होतं का फिस्कटतं? हे स्पष्ट होणार आहे.

advertisement

संजूसाठी कुणाची विकेट पडणार?

संजू सॅमसनसाठी राजस्थान रॉयल्सने सीएसकेच्या दिग्गज खेळाडूची मागणी केली आहे. हा खेळाडू कोण असणार? याबद्दल सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काही जणांनी ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे किंवा रवींद्र जडेजा या तीनपैकी एकाची विकेट संजूसाठी जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली आहे. ऋतुराज गायकवाड हा मागच्या मोसमात सीएसकेचा कर्णधार होता, पण दुखापतीमुळे त्याला आयपीएल अर्ध्यातच सोडावं लागलं आणि पुन्हा एकदा धोनी टीमचा कर्णधार झाला.

advertisement

राजस्थान रॉयल्ससोबत ट्रेड डिल झाली तर ऋतुराज गायकवाड पुढच्या मोसमात त्यांचा कर्णधारही बनू शकतो, कारण राजस्थानही कर्णधाराच्या शोधात आहे, तसंच ऋतुराजकडे कॅप्टन्सीचा अनुभव आहे.

शिवम दुबेच्या नावाची चर्चा

दुसरीकडे शिवम दुबे संजू सॅमसनच्या बदल्यात राजस्थानला दिला जाऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी ही राजस्थानची ओपनिंग जोडी निश्चित आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात राजस्थानला फिनिशर आणि सहाव्या बॉलरची उणीव भासली होती, जी भूमिका शिवम दुबे पार पाडू शकतो, त्यामुळे राजस्थानच्या दोन्ही अडचणी सुटू शकतात. याशिवाय काही चाहते जडेजाच्या नावाचाही उल्लेख करत आहेत.

advertisement

सीएसकेला मिळणार धोनीची रिप्लेसमेंट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीनच्या दराबद्दल नवी अपडेट, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

दुसरीकडे संजू सॅमसनच्या रुपात सीएसकेला धोनीची रिप्लेसमेंटही मिळणार आहे. धोनीने पुढची आयपीएल खेळणार असल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी तो आणखी फार सिझन खेळू शकणार नाही. या परिस्थितीमध्ये संजू विकेट कीपिंग तसंच सीएसकेची कॅप्टन्सीही करू शकतो.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSK ने शोधली धोनीची रिप्लेसमेंट, IPL ची सगळ्यात मोठी डिल, दुबे का गायकवाड, कुणाचा बळी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल