17 मे रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि केकेआर यांच्यात महत्त्वाचा सामना होणार आहे, पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगळुरूमध्ये पावसाची शक्यता सुमारे 65% आहे. जर सामन्यादरम्यान पाऊस पडला तर दोन्ही टीमना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. पावसामुळे सामना रद्द झाला तर आरसीबी अडचणीत येईल, कारण त्यांना एकच पॉईंट मिळेल आणि त्यांचे 17 पॉइंट्स होतील. यानंतर उरलेल्या दोन पैकी एक सामना आरसीबीला जिंकावा लागेल, ज्यामुळे आरसीबी टॉप-2 मध्ये स्थान मिळवू शकते. आरसीबी सध्या पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
advertisement
केकेआरला सगळ्यात मोठा धक्का
जर पावसामुळे सामना रद्द झाला तर केकेआरच्या आशाही धुळीस मिळतील. केकेआरला कोणत्याही परिस्थितीत आरसीबीविरुद्ध जिंकावेच लागेल. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर केकेआरच्या प्ले-ऑफला पोहोचण्याच्या आशा धुळीस मिळतील. केकेआरने या हंगामात आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 सामने त्यांनी जिंकले आहेत तर 6 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांच्या खात्यात 11 पॉइंट्स आहेत. केकेआर सध्या पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. जर आरसीबीविरुद्धचा सामना पावसामुळे सामना रद्द झाला तर केकेआरचे 12 पॉइंट्स होतील. अशा परिस्थितीत केकेआरला त्यांचे उरलेले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. हे करूनही त्यांना प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल.