या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट घेऊन तब्बल 278 रन केले. हेनरिक क्सासेनने 39 बॉलमध्ये 105 रन केले, यामध्ये 9 सिक्स आणि 7 फोरचा समावेश होता. तर ट्रेविस हेडने 40 बॉलमध्ये 76 रन केले, अभिषेक शर्माने 16 बॉल 32 रन करून हैदराबादला जलद सुरूवात करून दिली. केकेआरकडून सुनिल नरेनने 2 आणि वैभव अरोराने 1 विकेट घेतली.
advertisement
केकेआर आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन टीम मागच्या आयपीएलची फायनल खेळल्या होत्या, पण दोन्ही टीमना यंदा प्ले-ऑफमध्येही क्वालिफाय होता आलेलं नाही. हैदराबादने 14 पैकी 6 सामने जिंकले तर 7 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे 13 पॉईंट्ससह हैदराबाद सहाव्या क्रमांकावर राहिली. तर केकेआरने या मोसमात 14 सामन्यांमध्ये 5 विजय मिळवले आणि 7 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला, याशिवाय त्यांचे 2 सामने पावसाने रद्द झाले, त्यामुळे 12 पॉईंट्ससह केकेआर आठव्या क्रमांकावर राहिली.