TRENDING:

MS धोनीला बॅटिंग जमेना, थालासोबत असं का घडतंय? काय आहे कारण?

Last Updated:

Health Care: महेंद्रसिंह धोनी याच्या वय आणि खेळाची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. पण वयाच्या चाळीशीत खेळताना खरंच काय अडचणी येतात? हे डॉक्टरांकडून जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निरंजन कामत, प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर: सध्या आयपीएल 2025 स्पर्धा असून महेंद्रसिंह धोनीच्या वय आणि खेळवारून बरीच चर्चा होतेय. वाढत्या वयात खरंच खेळताना अडचणी येतात का? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातो. क्रिकेट विश्वात आणि इतरही खेळांमध्ये काही खेळाडू चाळीशीत असताना देखील चांगल्या प्रकारे खेळावर पकड राखून असल्याचं दिसतं. तर काही जणांना संघर्ष देखील करावा लागतो. याचबाबत कोल्हापूर येथील डॉक्टर अविनाश शिंदे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.

advertisement

वयाची चाळीशी गाठणं म्हणजे आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो. वय वाढत असताना शरीरात अनेक बदल होतात. विशेषतः 40 वर्षांनंतर शरीराची लवचिकता कमी होऊ लागते, हाडांमध्ये ठिसूळ पणा येऊ लागतो आणि सहनशक्तीही पूर्वीसारखी राहात नाही. तरीही, मैदानी खेळात सहभागी होणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण, यावेळी काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तसेच योग्य काळजी घेणे आवश्यक असते, असे डॉक्टर सांगतात.

advertisement

लहान वयात आईला गमावले, वडिलांनी केले दुसरे लग्न; काकांच्या सपोर्टने 30 लाखाच्या खेळाडूने IPL मध्ये रचला इतिहास!

चाळीशीनंतर काय होतं?

  1. शारीरिक अडचणी: चाळीशीनंतर स्नायूंची ताकद आणि लवचिकता कमी होऊ लागते. यामुळे खेळताना जखमेचा धोका वाढतो. विशेषतः धावणे, उड्या मारणे किंवा जलद हालचाली असलेल्या खेळांमध्ये मोच, ताण, किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.
  2. advertisement

  3. सहनशक्ती कमी होणे: हृदय-श्वसन क्षमतेत घट झाल्यामुळे दीर्घकाळ शारीरिक क्रिया करणे कठीण होऊ शकते. यामुळे खेळात लवकर थकवा येतो आणि कार्यक्षमता कमी होते.
  4. सांधेदुखी आणि अर्धांगवायूचा धोका: वय वाढल्यामुळे सांधेदुखी, विशेषतः गुडघे, नितंब आणि खांद्याच्या भागात होते. त्यामुळे हालचाल करणे त्रासदायक ठरू शकते. तसेच, हृदयविकाराचा धोका वाढल्यामुळे अत्यधिक शारीरिक श्रम धोकादायक ठरू शकतो.
  5. advertisement

  6. दृष्टी आणि संतुलनाची समस्या: वयासोबत दृष्टी कमी होणे आणि संतुलन राखण्याची क्षमता कमी होणे हेही सामान्य आहे. त्यामुळे मैदानावर हालचाली करताना किंवा चेंडू पकडताना अडचण येऊ शकते.

काळजी घेण्याचे मुद्दे

  1. योग्य वॉर्म-अप आणि स्ट्रेचिंग: खेळ सुरू करण्यापूर्वी वॉर्म-अप आणि स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे, जेणेकरून स्नायू आणि सांधे तयार होतील.
  2. योग्य पाणी पिणे: शारीरिक श्रमामुळे शरीरात पाणी कमी होऊ शकते. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
  3. शरीराच्या संकेतांवर लक्ष ठेवणे: थकवा, चक्कर येणे, छातीमध्ये दुखणे यासारखे लक्षणे दिसल्यास त्वरित खेळ थांबवा आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  4. योग्य खेळाची निवड: आपल्या शारीरिक क्षमतेनुसार योग्य खेळांची निवड करा. कमी तणावाचे खेळ जसे की योग, टेबल टेनिस, किंवा जलतरण हे चांगले पर्याय ठरू शकतात.
  5. नियमित आरोग्य तपासणी: वय वाढल्यावर आरोग्याची नियमित तपासणी करून आवश्यक ती काळजी घेणे उपयुक्त ठरते.

शेवटी, वय हा फक्त एक आकडा असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे चाळीशीनंतरही योग्य तयारी आणि काळजी घेतल्यास मैदानी खेळाचा आनंद घेत राहता येतो. आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी आणि शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी खेळ ही एक उत्कृष्ट संधी आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MS धोनीला बॅटिंग जमेना, थालासोबत असं का घडतंय? काय आहे कारण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल