TRENDING:

VIDEO : रोहितला पाहताच हात जोडले, पाया पाडला...पुढे 'हिटमॅन' जे केलं त्याने सगळ्यांची मन जिंकली

Last Updated:

रविवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स वानखेडेच्या मैदानावर भिडणार आहेत. या सामन्याआधी रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Rohit sharma Akash Madhawal VIDEO : आयपीएल 2026 च्या हंगामाला उद्या 28 मार्चपासून सूरूवात होणार आहे. या हंगामातला पहिला सामना हा रॉयल चँलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे.या सामन्यानंतर रविवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स वानखेडेच्या मैदानावर भिडणार आहेत. या सामन्याआधी रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये रोहित शर्माने पुन्हा एकदा सर्वांची मन जिंकली आहेत.
akash madhwal meet Rohit sharma
akash madhwal meet Rohit sharma
advertisement

रोहित शर्माचा वानखेडेच्या मैदानावरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा मैदानावर पाऊल ठेवतो. मैदानावर पाऊल ठेवताच रोहित शर्माला पाहून मुंबई इंडियन्सचा एक खेळाडू त्याला पाहून हात जोडतो, नंतर पुढे तो पाया पडण्याचा प्रयत्न करतो.इतक्यात रोहित शर्माच त्याच्या खांद्यावर हात टाकतो आणि चालू लागतो.

आता या घटनेत एक ज्यूनिअर खेळाडू रोहित शर्माला इतका आदर देतो ते पाहून त्याची लांबूनच चर्चा केली असती. पण मुंबईच्या राजा रोहित शर्मा जरा वेगळा आहे,कारण त्याने थेट खेळाडूच्या खांदयावरच हात ठेवला आहे आणि त्याला समजवत समजवत तो निघून गेला आहे.त्यामुळे रोहित शर्माचा हाच दिलदारपणा सगळ्यांना आवडला आहे.

advertisement

दरम्यान हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून आकाश मढवाल आहे. आकाश मढवाल हा आयपीएल 2026 च्या लिलावत अनसोल्ड राहिला होता.पण आता मुंबईचा अथर्व अंकोलेकर हा दुखापतग्रस झाल्याने तो संपूर्ण हंगाम स्पर्धेबाहेर झाला आहे,त्यामुळे त्याची रिप्लेसमेंट म्हणून मुंबई इंडियन्सने आकाश मढवालला ताफ्यात घेतले होते,असे बोलले जात होते. पण आता तो नेट बॉलर म्हणून संघात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

आकाश मढवाल हा वेगवान गोलंदाज आहे. तोस मुख्यतः डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर्स आणि स्किडी बॉलिंगसाठी ओळखले जातात. आकाश मढवालचा IPL मध्ये डेब्यू 2023 मध्ये झाला होता. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यत एकूण 17 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 23 विकेटस घेतल्या आहेत. आकाशला आयपीएलमध्ये फारशी खेळायची संधी मिळाली नाही. पण आता नेट बॉलर म्हणून मुंबईसाठी महत्वाची भूमिका निभावणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : रोहितला पाहताच हात जोडले, पाया पाडला...पुढे 'हिटमॅन' जे केलं त्याने सगळ्यांची मन जिंकली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल