TRENDING:

शाहरुखने 25 कोटी उधळले, पण ग्रीन फक्त बॅटिंगच करणार? अजिंक्यने हात झटकले अन् ऑस्ट्रेलियाला द्यावं लागलं उत्तर!

Last Updated:

Cricket Australia On Cameron Green : कॅमरून ग्रीनने बॉलिंग का केली नाही, हे मला नाही तर ऑस्ट्रेलियन बोर्डाला विचारा, असं अजिंक्य रहाणे म्हणाला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IPL 2026 KKR Cameron Green Bowling : वानखेडे स्टेडियमवर केकेआर आणि एमआय (MI vs KKR) यांच्यात आयपीएलचा (IPL 2026) दुसरा सामना खेळवला गेला होता. या सामन्यात कोलकाताची एक चूक दिसून आली. 25 कोटी खरेदी केलेल्या ऑलराऊंडर खेळाडूने बॉलिंगच केली नाही. कोलकाता संकटात असताना ऑलराउंडर कॅमेरून ग्रीन (Cameron Green) गेल्या मॅचमध्ये बॉलिंग का करू शकला नाही? असा सवाल सतत विचारला गेला होता. त्यावर रहाणे आणि त्यानंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उत्तर दिलं आहे.
Cricket Australia Clear On Cameron Green Bowling
Cricket Australia Clear On Cameron Green Bowling
advertisement

ऑस्ट्रेलियन बोर्डाला विचारा - अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे याने पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डावर बोट ठेवलं होतं. कॅमरून ग्रीनने बॉलिंग का केली नाही, हे मला नाही तर ऑस्ट्रेलियन बोर्डाला विचारा, असं अजिंक्य रहाणे म्हणाला होता. त्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं आहे की, कॅमरून ग्रीन सध्या पाठीच्या किरकोळ दुखापतीने (Back complaint) त्रस्त आहे. याच कारणामुळे मुंबई इंडियन्स विरुद्धच्या हायव्होल्टेज मॅचमध्ये तो केवळ बॅट्समन म्हणून मैदानात उतरला होता.

advertisement

advertisement

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितलं...

कॅमेरून ग्रीनच्या फिटनेसबाबत माहिती देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, तो सध्या भारतातच आपल्या रिकव्हरीवर काम करत आहे. त्याच्या पाठीवर पडणारा बॉलिंगचा ताण (Bowling loads) हळूहळू वाढवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. साधारणपणे पुढच्या 10 ते 12 दिवसांत तो पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने बॉलिंग करण्यासाठी सज्ज होईल, अशी आशा व्यक्त क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

advertisement

कॅमरून ग्रीनचा स्ट्राईक रेट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जेवणाला येईल रुचकरपणा, कमी वेळेत बनवा पारंपरिक पाटवडी, रेसिपीचा Video
सर्व पहा

दरम्यान, 25 कोटीच्या प्लेयरने पहिल्या मॅचमध्ये 25 रन देखील केले नाहीत. कॅमरून ग्रीनने 10 बॉलमध्ये 18 धावा केल्या. कॅमरून ग्रीनचा स्ट्राईक रेट मात्र चांगला होता. 180 च्या स्ट्राईक रेटने कॅमरून ग्रीन वन डाऊनला खेळला. तर रिंकु सिंग आणि अंगरिक सुर्यवंशी याने देखील चांगली फिनिशिंग केली.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
शाहरुखने 25 कोटी उधळले, पण ग्रीन फक्त बॅटिंगच करणार? अजिंक्यने हात झटकले अन् ऑस्ट्रेलियाला द्यावं लागलं उत्तर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल