कर्ण शर्माला रिल्पेस करणार मयंक मार्केंडे
अशातच मुंबई इंडियन्सच्या एका शातीर चालीची चर्चा होताना दिसतीये. मुंबई इंडियन्सने तीन वेळच्या चॅम्पियन खेळाडूला रिलीज केलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून कर्ण शर्मा आहे. कर्ण शर्मा याला मुंबई इंडियन्सला टाटा गुड बाय केलंय. फिरकीपटू करण शर्मा ज्या संघाचा भाग होता, त्या संघाने आत्तापर्यंत 3 वेळा IPL चे विजेतेपद जिंकले आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा देखील समावेश आहे.
advertisement
इतिहासातील असा एकमेव खेळाडू
करण शर्माने सलग तीन वर्षांमध्ये तीन वेगवेगळ्या संघांकडून IPL ट्रॉफी जिंकण्याचा एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील असा एकमेव खेळाडू आहे, ज्याने सलग तीन सिझनमध्ये तीन वेगवेगळ्या विजेत्या संघांचे प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र, मुंबई इंडियन्सने त्याला बाहेरचा रस्ता दाखवलाय. त्याजागी 8 वर्षापूर्वी शोधलेला हिरा संघात सामील करून घेतलाय.
मयंक मार्केंडे
मागील सिझनपूर्वी लेग स्पिनर मयंक मार्केंडे हा मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. 2018 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडूनच पदार्पण केलं होतं आणि आपल्या पहिल्याच सीझनमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत लक्ष वेधून घेतलं. तो 2019 आणि 2022 च्या हंगामातही MI संघात होता. 2019 मध्ये विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचा तो सदस्य होता.
मुंबई इंडियन्स रिटेन प्लेयर्स - हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रयान रिकलटन, रॉबिन मिंज, मिशेल सेंटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफ़नज़ार, अश्वानी कुमार, दीपक चाहर आणि विल जॅक.
मुंबई इंडियन्स रिलीज प्लेयर्स - सत्य नारायण राजू, रीस टॉप्ली, बेवॉन जॅकब्स, मुजीब-उर रहमान, लिजाद विलियम्स, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंदुलकर आणि कर्ण शर्मा.
