मुंबई इंडियन्सने त्यांच्या 9 खेळाडूंना सोडलं असलं, तरी त्यांची कोअर टीम कायम आहे. आयपीएल ट्रे़डमध्ये मुंबईने शार्दुल ठाकूर आणि शरफेन रदरफोर्डला टीममध्ये घेतलं आहे.
मुंबईने कुणाला सोडलं?
सत्यनारायण राजू (30 लाख)
रीस टॉपली ( 75 लाख)
के श्रीजित ( 30 लाख)
कर्ण शर्मा ( 50 लाख)
अर्जुन तेंडुलकर (30 लाख)
advertisement
बेवॉन जेकब्स (30 लाख)
मुजीब उर रहमान (2 कोटी)
लिझार्ड विलियम्स (75 लाख)
विघ्नेश पुथ्थुर (30 लाख)
मुंबईने विघ्नेश पुथ्थुरला रिलीज केल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. डावखुरा स्पिनर असलेल्या विघ्नेश पुथ्थुरला मुंबईने शोधलं होतं, त्यानंतर पहिल्याच सामन्यात विघ्नेशने चमकदार कामगिरी केली होती, पण एका मोसमामध्येच मुंबईने विघ्नेशला रिलीज केलं आहे.
मुंबईच्या टीममध्ये आता कोण उरलं?
अल्लाह गझनफर, अश्विनी कुमार, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे, मिचेल सॅन्टनर, नमन धीर, रघू शर्मा, राज अंगद बावा, रॉबिन मिन्झ, रोहित शर्मा, रियान रिकलटन, शार्दुल ठाकूर, शरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ट्रेन्ट बोल्ट, विल जॅक्स
