गुजरात टायटन्सने आयपीएल 2026 आधी महिपाल लोमरोर, दसून शनाका, गेराल्ड कोटझी, कुलवंत खेजरोलिया, करिम जन्नत यांना रिलीज केलं आहे, तर शरफेन रदरफोर्डला मुंबई इंडियन्सना ट्रेड केलं आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात वैभव सूर्यवंशीने 38 बॉलमध्ये 101 रनची खेळी केली. 265.79 च्या स्ट्राईक रेटने वैभवने 11 सिक्स आणि 4 फोर मारल्या. वैभव सूर्यवंशी आयपीएल इतिहासातला सगळ्यात लहान वयात शतक करणारा खेळाडू ठरला, तसंच आयपीएल इतिहासातलं गेलनंतर दुसरं जलद शतक वैभवने झळकावलं. वैभवच्या या बॅटिंगचा तडाखा गुजरातच्या बॉलरनाही बसला, पण आता त्यांच्या बॉलरचं आयपीएल करिअरच संकटात आलं आहे.
advertisement
वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात फास्ट बॉलर करीम जन्नतच्या एका ओव्हरमध्येच 30 रन काढल्या. करीम जन्नतच्या या ओव्हरमध्ये वैभवने 3 फोर आणि 3 सिक्स मारले. वैभव सूर्यवंशीच्या या वादळी खेळीनंतर करीम जन्नतला आयपीएलच्या पुढच्या एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही, यानंतर आता गुजरातने त्याला टीममधूनही बाहेर केलं आहे. अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या करीम जन्नतवर आता आयपीएल लिलावात बोली लागणार का? यावरच त्याचं आयपीएल करिअर अवलंबून असणार आहे.
