TRENDING:

IPL च्या एका ट्रेडने 9 टीमचा गेम बिघडवला, सॅम करनचा बदली खेळाडू पीएसएलला लाथ मारून आला!

Last Updated:

पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधून आणखी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूने माघार घेत आयपीएलचा रस्ता धरला आहे. मागच्या काही दिवसांमध्ये पीएसएलमधून आयपीएलमध्ये येणाऱ्या खेळाडूंचं प्रमाण वाढलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधून आणखी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूने माघार घेत आयपीएलचा रस्ता धरला आहे. मागच्या काही दिवसांमध्ये पीएसएलमधून आयपीएलमध्ये येणाऱ्या खेळाडूंचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे पीएसएल स्पर्धेसमोर संकट ओढावलं आहे. आयपीएल 2026 च्या आधी अनेक खेळाडूंना दुखापत झाली आहे, त्यामुळे आयपीएल टीम बदली खेळाडूंच्या शोधात आहेत. पीएसएल आणि आयपीएल एकाच वेळी खेळवल्या जाणार आहेत, त्यामुळे खेळाडू पीएसएल सोडून आयपीएलला प्राधान्य देत आहेत.
IPL च्या एका ट्रेडने 9 टीमचा गेम बिघडवला, सॅम करनचा बदली खेळाडू पीएसएलला लाथ मारून आला!
IPL च्या एका ट्रेडने 9 टीमचा गेम बिघडवला, सॅम करनचा बदली खेळाडू पीएसएलला लाथ मारून आला!
advertisement

श्रीलंकेचा क्रिकेटपटू दासुन शनाका हा पीएसएलमधून आयपीएलमध्ये एन्ट्री झालेला आणखी एक खेळाडू ठरला आहे. दासुन शनाका हा आयपीएल 2026 साली राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये येणार आहे. राजस्थान रॉयल्सचा ऑलराऊंडर सॅम करन हा दुखापत झाल्यामुळे यंदाच्या मोसमात खेळू शकणार नाही, त्याच्याऐवजी दासुन शनाका राजस्थानच्या टीममध्ये येईल, असं वृत्त समोर आलं आहे.

दासूनसोबत राजस्थानचा करार

advertisement

'हो आम्ही दासुन शनाकासोबत करार करण्याच्या जवळ आहोत. काही औपचारिकता शिल्लक आहेत, त्याला श्रीलंकन क्रिकेट बोर्डासोबत काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल', असं राजस्थान रॉयल्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने क्रिकबझसोबत बोलताना सांगितलं. आयपीएल 2026 साठी झालेल्या लिलावात दासुन शनाका विकला गेला नव्हता, त्यानंतर त्याने पीएसएल लिलावासाठी अर्ज केला, ज्यात लाहोर कलंदर्सने त्याला 75 लाख पाकिस्तानी रुपयांना विकत घेतलं.

advertisement

पीएसएलमधून आयपीएलमध्ये जाणारा दासुन शनाका हा अलीकडच्या काळातील दुसरा खेळाडू आहे. याआधी झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझारबानीने इस्लामाबाद युनायटेडसोबतचा आपला करार रद्द केला आणि त्याने केकेआरमध्ये प्रवेश केला. मुस्तफिजुर रहमानच्या ऐवजी केकेआरने मुझारबानीला टीममध्ये आणलं. याआधी मागच्या मोसमात दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशने पेशावर झाल्मीची साथ सोडली आणि मुंबई इंडियन्ससोबत करार केला.

कायदेशीर कारवाई करणार

advertisement

पीएसएल सोडून आयपीएल खेळायला जाणाऱ्या खेळाडूंवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कारवाईचा इशारा दिला आहे. पीएसएलचा करार मोडणाऱ्या खेळाडूंवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी म्हणाले आहेत.

दासुन शनाका राजस्थानमध्ये का?

राजस्थान रॉयल्सने दासुन शनाकाची केलेली निवड ही अनेकांसाठी आश्चर्यकारक नाही, कारण राजस्थानचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा हे श्रीलंकन आहेत, तर सहाय्यक प्रशिक्षक विक्रम राठोड हे नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपदरम्यान श्रीलंकेचे बॅटिंग कोच होते. टी-20 वर्ल्ड कपमध्ये शनाका श्रीलंकेचा कर्णधार होता, पण स्पर्धेत श्रीलंकेला सेमी फायनल गाठण्यात अपयश आले. दासुन शनाकाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 अर्धशतकं झळकावली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: ऊन तापलं, मार्केट हाललं, लिंबू, केळीच्या आवकेत घट; द्राक्षे, कांद्याला कुठं मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान दासुन शनाकाने रिलीज करण्याची मागणी आमच्याकडे केली नसल्याची प्रतिक्रिया पीएसएल टीम लाहोर कलंदरकडून सांगण्यात आलं आहे. दासुन शनाका सोडून गेला तरी आमच्याकडे डॅनियल सॅम्सच्या रुपात बदली खेळाडू तयार आहे, असं लाहोर कलंदरकडून सांगितलं गेलं आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL च्या एका ट्रेडने 9 टीमचा गेम बिघडवला, सॅम करनचा बदली खेळाडू पीएसएलला लाथ मारून आला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल