TRENDING:

IPL 2026 : पहिले पाचही सामने बोअरिंग... T20 चा थरार कुठे गेला? एकाच पॅटर्नमुळे होतोय टीमचा घात!

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये सर्व 10 टीमचे पहिले सामने पार पडले आहेत. आतापर्यंत झालेल्या 5 सामन्यांमध्ये विजयाचा एकच पॅटर्न समोर आला आहे, तसंच पहिल्या पाच सामन्यांपैकी एकही सामना थरारक झालेला नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएल 2026 मध्ये सर्व 10 टीमचे पहिले सामने पार पडले आहेत. आतापर्यंत झालेल्या 5 सामन्यांमध्ये विजयाचा एकच पॅटर्न समोर आला आहे, तसंच पहिल्या पाच सामन्यांपैकी एकही सामना थरारक झालेला नाही, जे स्पर्धेची चिंता वाढवणारं आहे. आयपीएलच्या सुरूवातीलाच स्पर्धेच्या नियमांवरून बऱ्याच चर्चा झाल्या, तसंच आयपीएलच्या जवळपास सगळ्याच कर्णधारांनी इम्पॅक्ट सबच्या नियमाबाबत नाराजी व्यक्त केली.
पहिले पाचही सामने बोअरिंग... T20 चा थरार कुठे गेला? एकाच पॅटर्नमुळे होतोय टीमचा घात!
पहिले पाचही सामने बोअरिंग... T20 चा थरार कुठे गेला? एकाच पॅटर्नमुळे होतोय टीमचा घात!
advertisement

कर्णधारांच्या नाराजीनंतर आयपीएलने 2027 नंतर इम्पॅक्ट सबच्या निर्णयाचा पुनर्विचार करू, असं आश्वासन दिलं आहे. इम्पॅक्ट सबचा वाद संपत नाही तोच आता पहिल्या 5 सामन्यांनंतर टॉसचा मुद्दा समोर आला आहे. आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत झालेल्या 5 सामन्यांमध्ये सर्व कर्णधारांनी टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि नंतर मॅचही जिंकली.

टॉसमुळे होतोय टीमचा घात

advertisement

आयपीएल 2026 मध्ये रन चेस करणाऱ्या टीमचा पाचही सामन्यांमध्ये विजय झाला आहे. प्रत्येक सामन्यात कर्णधाराने टॉस जिंकून पहिले बॉलिंग घेतली त्यानंतर टॉस जिंकणाऱ्या टीमने मॅचही खिशात टाकली. 200 पेक्षा जास्त रनचं आव्हानही टीमने अगदी सहज पार केल्याचं पाहायला मिळालं. इम्पॅक्ट सब आणि दुसऱ्या इनिंगमध्ये येणारं दव ही दोन प्रमुख कारणं यामागे असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.

advertisement

आयपीएलचा पहिला सामना आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झाला. या सामन्यात आरसीबीने हैदराबादचं 202 रनचं आव्हान फक्त 15.4 ओव्हरमध्ये पार केलं. आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदाच इतक्या जलद 200 पेक्षा जास्त रनचा यशस्वी पाठलाग झाला. याआधी पंजाबने 2014 साली हैदराबादमध्ये 206 रन चेस केले होते.

दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरने दिलेलं 221 रनचं आव्हान 6 विकेट गमावून पार केलं. यानंतर राजस्थान रॉयल्सने सीएसकेला 128 रनवर रोखलं आणि अगदी सहज विजय मिळवला. पंजाब किंग्सनेही गुजरातविरुद्ध आणि दिल्लीने लखनऊविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करतानाच विजय मिळवला.

advertisement

आयपीएलच्या पहिल्या 5 सामन्यांचे निकाल

RCB vs SRH

आरसीबीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर हैदराबादने पहिले बॅटिंग करताना 201/9 एवढा स्कोअर केला. हे आव्हान आरसीबीने 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं.

MI vs KKR

या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला त्यानंतर केकेआरने 20 ओव्हरमध्ये 220/4 एवढा स्कोअर केला. मुंबईने हे आव्हान 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं.

advertisement

RR vs CSK

या सामन्यात राजस्थानचा कर्णधार रियान परागने टॉस जिंकून पहिले बॉलिंग घेतली आणि सीएसकेला फक्त 127 रनवर रोखलं. हे आव्हान राजस्थानने 12.1 ओव्हरमध्येच 8 विकेट राखून पार केलं.

Punjab vs Gujarat

पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले फिल्डिंग घेतली. यानंतर गुजरातला 20 ओव्हरमध्ये 162/6 पर्यंत मजल मारता आली, हे आव्हान पंजाबने 19.1 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून पार केलं.

LSG vs DC

या सामन्यात दिल्लीने टॉस जिंकून बॉलिंग घेतली यानंतर लखनऊचा फक्त 141 रनवर ऑलआऊट झाला. दिल्लीने हे आव्हान 17.1 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पावसाने घेतली पुणे पालिकेची 'परीक्षा', ढगफुटी की आणखी काही? महापौरांनी स्पष्ट सांगितलं!
सर्व पहा

छोटी मैदानं, इम्पॅक्ट सबचा नियम, धुकं आणि पॉवर प्लेमध्ये आक्रमक बॅटिंग, या काही कारणांमुळे आतापर्यंतच्या स्पर्धेत टॉस जिंकणाऱ्या टीमच विजयी झाल्या आहेत. आयपीएलचा रोमांच वाढवण्यासाठी हा ट्रेंड ब्रेक करण्याचं आव्हान सर्व टीमसमोर असणार आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : पहिले पाचही सामने बोअरिंग... T20 चा थरार कुठे गेला? एकाच पॅटर्नमुळे होतोय टीमचा घात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल