खरं तर 16 डिसेंबर 2025 ला आयपीएला मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावाआधी सर्वच खेळाडू आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून त्यांना आयपीएलमध्ये चांगली बोली लागेल.याच प्रयत्नातून गुरूवारी क्विंटन डिकॉकने 90 धावांची खेळी केली होती. ही खेळी पाहता या विकेट किपर बॅटरला आयपीएलमध्ये मोठी लागेल अशी डिकॉकला आशा होती. पण डिकॉकच्या या आशेवर 16 तासातच भारतीय खेळाडूने पाणी फेरले आहे.
advertisement
क्विंटन डिकॉक हा मागचा हंगाम कोलकत्ता नाईट रायडर्सकडून आयपीएल खेळला आहे. आणि यंदाच्या हंगामात या विकेटकिपर, बॅटरला कोलकत्ताने रिटेनच केले नव्हते. त्यामुळे यंदा तो 1 कोटीच्या बेसप्राईजच्या रक्कमेवर लिलावात उतरला आहे. पण या लिलावाआधीच मोठा गेम झाला आहे.
त्याचं झालं असं की कोलकत्ता नाईट रायडर्स भारताच्या एका युवा खेळाडूला संघात घेण्यास इच्छुक आहे. सलील अरोरा असे या खेळाडूचे नाव आहे.या खेळाडूने आज 45 बॉलमध्ये 125 धावांनी नाबाद खेळी केली.या खेळीत त्याने 11 षटकार आणि 9 चौकार मारले होते. 277 च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या होत्या. सलील एक बॅटर आणि विकेटकिपर देखील आहे.त्यामुळे सलीलच्या या खेळीने क्विंटन डिकॉकचे भाव पूर्णपणे उतरले आहेत.विषेश म्हणजे आता कोलकत्ताला कमी पैशात बॅटर आणि विकेटकिपर मिळणार आहे. त्यामुळे क्विंटन डिकॉकच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आता कोलकत्ता नाईट रायडर्स सलील अरोराला संघात घेते की क्विंटन डिकॉकला हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
