कुणाकुणाला ताब्यात घेतलं?
ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये एचसीए अध्यक्ष ए. जगन मोहन राव यांच्या व्यतिरिक्त कोषाध्यक्ष सी. श्रीनिवास राव, सीईओ सुनील कांते, महासचिव राजेंद्र यादव आणि त्यांची पत्नी जी. कविता यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सनरायझर्स हैदराबादने केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या तक्रारीत एचसीए वारंवार 'ब्लॅकमेलिंग' करत असल्याचा आरोप करत क्रिकेट नियामक संस्थांच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली होती. दुसरीकडे, राज्य क्रिकेट युनिटने फ्रँचायझीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते.
advertisement
3900 फ्री पासचे वाटप
वास्तविक, तीन महिन्यांपूर्वी सनरायझर्स हैदराबादने बीसीसीआय (BCCI) आणि आयसीसी (ICC) संचालन परिषदेकडे तक्रार केली होती की, हैदराबाद क्रिकेट असोसिएशन वारंवार अतिरिक्त फ्री पाससाठी त्यांना ब्लॅकमेल करत आहे. असेच सुरू राहिल्यास त्यांना आपले होम मॅच (घरचे सामने) इतर राज्यात हलवावे लागतील, अशी धमकीही फ्रँचायझीने दिली होती. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशन यांच्यात झालेल्या बैठकीत 3900 फ्री पासचे वाटप सुरू ठेवण्यावर सहमती झाली होती. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, येत्या काळात यात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.