TRENDING:

Jay Shah : पाकिस्तानला टोला अन् जय शहांनी सांगितलं 'मिशन 2036', कॅप्टन सूर्याला काय दिला मोलाचा सल्ला?

Last Updated:

Jay Shah Advice for 2036 Olympics in india : जय शहा यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशला टोला लगावला असून यावेळी त्यांनी कॅप्टन सूर्यकुमार यादवला महत्त्वाच्या सुचना देखील केल्या आहेत. यावेळी त्यांनी टीम इंडियाचं कौतुक देखील केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Jay Shah Advice Suryakumar Yadav : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात रडीचा डाव सुरू होता. अखेर पाकिस्तानने नमती भूमिका घेतली अन् वर्ल्ड कप खेळण्यासाठी तयार झाले. अशातच सीएनबीसी आणि नेटवर्क 18 च्या कार्यक्रमात बोलताना आयसीसीने अध्यक्ष जय शहा यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशला टोला लगावला असून यावेळी त्यांनी कॅप्टन सूर्यकुमार यादवला महत्त्वाच्या सुचना देखील केल्या आहेत. यावेळी त्यांनी टीम इंडियाचं कौतुक देखील केलं.
Jay Shah Advice Suryakumar Yadav Start practice cricket for 2036 Olympics
Jay Shah Advice Suryakumar Yadav Start practice cricket for 2036 Olympics
advertisement

पाकिस्तान आणि बांगलादेशला टोला

आयसीसीचा वर्ल्ड कप महत्त्वाचा होता. कारण टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या आधी चर्चा चालू होती की, ही टीम खेळेल की नाही खेळेल. वर्ल्ड कप कसा होणार? पण ऑर्गनायझेशनपेक्षा मोठी कोणतीही टीम नसते. सर्व टीम मिळून ऑर्गनायझेशन तयार होते. कोणा एका टीममुळे ऑर्गनायझेशन नसते, असं म्हणत जय शहा यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशला टोला लगावला.

advertisement

मी सूर्याला एकच मेसेज देऊ इच्छितो की...

असोसिएटस देशांनी चांगला खेळ दाखवला. युएसएने टीम इंडियाला टफ फाईट दिली. झिम्बॉब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवलं. नेदरलँडने पाकिस्तानला अडचणीत आणलं. त्यामुळे असोसिएटस देशांनी अप्रतिम खेळ दाखवलाय. मी गेल्या 17 वर्षापासून क्रिकेट अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आहे. मी सूर्याला एकच मेसेज देऊ इच्छितो की, टॉपवरून बॉटमला येयला खूप वेळ लागत नाही. पण बॉटमवरून टॉपवर येयला खूप वेळ लागतो. तुम्हाला आता फक्त आहे त्या जागी स्टेबल रहायचं आहे.

advertisement

तुम्हाला 2036 ची तयारी करायचीय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोनदा अपयश पण जिद्द नाही सोडली, पुण्याच्या आर्याने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मिळवलं यश, Video
सर्व पहा

तुम्ही मेहनत करत रहा, तुम्हाला अवॉर्ड मिळत नाही. मी बीसीसीआयमध्ये होतो तेव्हा 2028 च्या ऑम्पिक्सपर्यंतची तयारी केली होती. पण तुम्हाला 2030 ची तयारी करायचीये, तुम्हाला 2032 ची तयारी करायचीये आणि विशेष करून तुम्हाला 2036 ची तयारी करायची आहे, असं जय शहा म्हणाले. 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक्स आयोजित केलं जाणार आहे. त्यात क्रिकेटचा समावेश असेल. त्यासाठी जय शहा यांनी तयारी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Jay Shah : पाकिस्तानला टोला अन् जय शहांनी सांगितलं 'मिशन 2036', कॅप्टन सूर्याला काय दिला मोलाचा सल्ला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल