TRENDING:

वर्ल्ड कप जिंकताच जय शाहांनी पाकिस्तान बांगलादेशची बोलतीच बंद केली, एका वाक्यात विषय संपवला

Last Updated:

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह, सूर्यकुमार यादव,गौतम गंभीर या तिघांनी CNBC TV18 च्या इडिया बिझनेस लीडर्स अवॉर्ड सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी जय शहा यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशच्या वर्ल्डकप ड्राम्यावर बोलताना त्यांची बोलती बंद केली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Jay Shah india business leaders awards 2026 CNBC TV18 : टीम इंडियाने मागच्या रविवारी कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव, टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीर आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाहा ट्रॉफी घेऊन दादरच्या सिद्धीविनायक मंदिरात पोहोचले होते.त्यानंतर आज जय शाहा, सूर्यकुमार यादव,गौतम गंभीर या तिघांनी CNBC TV18 च्या इडिया बिझनेस लीडर्स अवॉर्ड सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती.यावेळी जय शाह यांना सीएनबीसीचा क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान पुरस्कार मिळाला आहे.तसेच जय शहा यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशच्या वर्ल्डकप ड्राम्यावर बोलताना त्यांची बोलती बंद केली होती.
jay shah
jay shah
advertisement

खरं तर टी20 वर्ल्ड कप दरम्यान बांगलादेश टीमची हकालपट्टी केल्यानंतर पाकिस्तानने त्यांना पाठिंबा देण्यासाठी भारताविरूद्ध सामन्यावर बहिष्काराची भूमिका घेतली होती. त्यामुळे वर्ल्ड कप सूरू असताना पाकिस्तानने मोठा ड्रामा केला होता. पाकिस्तानच्या या ड्राम्यानंतर शेवटी ते भारताविरूद्ध खेळण्यास तयार झाले आहेत.ज्यामध्ये भारताने बांगलादेशचा पराभव केला होता.

दरम्यान पाकिस्तानच्या या ड्राम्यावर आतापर्यंत जय शहा काहीच बोलले नव्हते. पण आता CNBC TV18 च्या इडिया बिझनेस लीडर्स अवॉर्ड सोहळ्यात जय शाहा यांनी पाकिस्तान आणि बांग्लादेशला सुनावलं आहे.

advertisement

वर्ल्ड कप सूरू होण्याआधी चर्चा करत होते, ही (पाकिस्तान) टीम खेळणार की नाही, त्यामुळे वर्ल्डकप कसा होणार? असा प्रश्न होता.पण आयसीसीचा अध्यक्ष म्हणून मी सांगतो, ऑर्गनायझेशन पेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाहीी आहे.एका टीमने ऑर्गनायझेशन बनत नाही, सगळ्या टीम बनून ऑर्गनायझेशन बनते,अशा शब्दात जय शाहा यांनी पाकिस्तान बांगलादेशला सुनावलं.

वर्ल्ड कपमध्ये यावेळी व्युवरशीपचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच 7.2 मिलियन्स व्हुस आले होते.त्यामुळे हा वर्ल्डकप खुप महत्वपुर्ण म्हणून समोर आला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोनदा अपयश पण जिद्द नाही सोडली, पुण्याच्या आर्याने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मिळवलं यश, Video
सर्व पहा

2019 ला मी बीसीसीआय जॉईन केलं होतं.तेव्हापासून म्हणजेच 2019 ते 2026 या सात वर्षात टीम इंडियाने दोन अंडर 19 मेन्स वर्ल्डकप,दोनदा अंडर 19 वुमेन्स वर्ल्ड कप, दोनदा रनरअप WTC फायनलला,एक बार वनडेत रनरअप, दोनदा कॉन्झिक्युटीव्ह टी20 चॅंम्पियनशीप आणि 2025 ला चॅम्पियनशीप ही खूप मोठी गोष्ट आहे,असे जय शहा सांगतात.क्रिकेटमध्ये एक वेळ अशी होती की ऑस्ट्रेलिया जिंकायची पण आता भारत म्हणजे विजय असं आता झालं आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वर्ल्ड कप जिंकताच जय शाहांनी पाकिस्तान बांगलादेशची बोलतीच बंद केली, एका वाक्यात विषय संपवला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल