TRENDING:

IPL मधून 26 कोटी घेऊनही पैशांची हाव मिटेना, KKR चा ऑलराऊंडर गेला पाकिस्तानच्या दारात!

Last Updated:

आयपीएलमधून 26.25 कोटी रुपये कमावणारा खेळाडू आता पीएसएल खेळण्यासाठी गेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएलमधून 26.25 कोटी रुपये कमावणारा खेळाडू आता पीएसएल खेळण्यासाठी गेला आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसण्याची त्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पण यंदा मात्र तो बऱ्याच काळानंतर पीएसएलमध्ये खेळताना दिसणार आहे. भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल आणि पीएसएल दोन्ही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. शस्त्रसंधी झाल्यानंतर आता दोन्ही देशांच्या टी-20 स्पर्धा 17 मे पासून पुन्हा सुरू होत आहेत. आयपीएलमधून मजबूत पैसा कमावणारा बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकीब अल हसन आता पीएसएलमध्ये खेळणार आहे. तब्बल 8 वर्षांनंतर शाकिब अल हसन पीएसएलमध्ये दिसेल.
IPL मधून 26 कोटी घेऊनही पैशांची हाव मिटेना, KKR चा ऑलराऊंडर गेला पाकिस्तानच्या दारात!
IPL मधून 26 कोटी घेऊनही पैशांची हाव मिटेना, KKR चा ऑलराऊंडर गेला पाकिस्तानच्या दारात!
advertisement

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाकिब अल हसनने पाकिस्तान सुपर लीगच्या 10 व्या हंगामात खेळण्याची पुष्टी केली आहे. शाकिब लाहोर कलंदर्सकडून खेळेल. पीएसएलमधला शाकिबचा हा तिसरा संघ असेल. याआधी 2016 मध्ये शाकिब कराची किंग्जकडून खेळला होता. तर 2017 मध्ये त्याने शेवटची पीएसएल पेशावर झल्मीकडून खेळली होती. लाहोर कलंदर्स सध्या पीएसएल पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

advertisement

आयपीएलमध्ये दोघांकडून खेळला शाकिब

पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्सने शाकिबला किती पैसे दिले आहेत? याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही, पण आयपीएलचे 11 हंगाम खेळून शाकिबने 26.25 कोटींची कमाई केली आहे. 2011 साली शाकिब अल हसनने केकेआरकडून पदार्पण केले, केकेआरने शाकिबला 1.95 कोटी रुपयांना विकत घेतले होते. सलग 7 मोसम केकेआरकडून खेळल्यानंतर 2018 साली सनरायजर्स हैदराबादने शाकिबला 2 कोटी रुपयांना विकत घेतलं. यानंतर 2019 च्या मोसमासाठी हैदराबादने शाकिबला टीममध्ये कायम ठेवलं.

advertisement

2020 मध्ये एसआरएचने शाकिबला सोडल्यानंतर, केकेआरने त्याला 2021 च्या आयपीएल हंगामासाठी परत विकत घेतले, यानंतर 2022 मध्ये शाकिब खेळला नाही, पण तो 2023 च्या आयपीएलमध्ये केकेआरकडून पुन्हा खेळताना दिसला. 2025 च्या आयपीएलसाठी शाकिबने त्याची बेस प्राईस 1 कोटी रुपये ठेवली होती. पण तरीही, कोणत्याही टीमने त्याला खरेदी केले नाही. आयपीएलच्या 11 हंगामात 2 संघांकडून खेळताना शकिब अल हसनने मिळवलेली एकूण रक्कम 26.25 कोटी रुपये इतकी आहे.

advertisement

शाकिब पीएसएलमध्ये का खेळणार?

आयपीएलमध्ये कोणत्याच टीमने विकत न घेतल्यामुळे शाकिब आता पीएसएलमध्ये खेळणार आहे. बांगलादेशची क्रिकेट टीम 17 मे पासून यूएईसोबत टी-20 मालिका खेळणार आहे. पण क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यामुळे, शाकिब बांगलादेश टीमचा भाग नाही, म्हणूनच पीएसएलमध्ये खेळण्याचा त्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

शाकिब अल हसन बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. तो शेवटचा अबू धाबी टी-10 लीगमध्ये बांगला टायगर्सकडून खेळताना दिसला होता. शाकिबने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आशिया कपमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भाग घेतला नाही. इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सरेकडून खेळताना शाकिबच्या बॉलिंग अॅक्शनवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर त्याने बॉलिंग टेस्ट दिली, ज्यामध्ये तो पास झाला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL मधून 26 कोटी घेऊनही पैशांची हाव मिटेना, KKR चा ऑलराऊंडर गेला पाकिस्तानच्या दारात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल