कुलदीपने रिंकूच्या कानशिलात लगावली
समोर आलेल्या व्हिडीओनुसार, केकेआरने दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी विजय मिळवल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर एकमेकांशी बोलत होते. संघाचे सर्व खेळाडू चर्चा करत असताना रिंकु सिंग आणि कुलदीप यादव यांच्यात हसत चर्चा सुरू होती. त्यावेळी अचानक कुलदीपने रिंकूच्या कानशिलात लगावली. त्यानंतर रिंकीचं तोंड पडल्याचं दिसून आलं. याच दरम्यान, व्हिडिओमध्ये कुलदीप यादव रिंकू सिंगच्या चेहऱ्यावर दोन वेळा थप्पड मारताना दिसत आहे.
advertisement
रिंकु सिंग चिडला अन्...
रिंकू सिंग दुसऱ्या कानशिलात मारल्यानंतर स्पष्टपणे अस्वस्थ अवस्थेत दिसत होता. रिंकु सिंग कुलदीपच्या कृतीवर रागावलेला दिसत होता आणि त्याने कुलदीपशी काहीतरी बोलला. त्यानंतर देखील कुलदीपने आणखी एक थप्पड रिंकु सिंगला मारली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे. दोघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं? यावर अद्याप अधिकृत माहिती आली नाही. पण हा वाद पेटण्याची शक्यता आहे.