खरं तर लखनऊ सूपर जाएटसचे मालक संजीव गोयंका मॅच दरम्यान प्रचंड अॅक्टीव्ह असतात.मैदानात येऊन ते खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवत असतात.तसेच सामन्यानंतर देखील ते मैदानात येऊन खेळाडूंसोबत निकालावर चर्चा करत असतात. बुधवारी देखील लखनऊ सूपर जाएटसच्या पराभवानंतर लखनऊचे मालक संजीव गोयंका मैदानात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत लखनऊचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर देखील होते. या दोघांसोबत रिषभ पंत देखील होता.यावेळी तिघांमध्ये लखनऊ सूपर जाएटसच्या पराभवावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
advertisement
या चर्चे दरम्यान लखनऊचे मालक संजीव गोयंका सामन्याच्या निकालावर निराश झाल्याचे दिसत होते. संजीव गोयंका यांना लखनऊचा झालेला पराभव अजिबात पटलेला दिसत नाही आहे.त्याच्या हावाभावावरून हे व्हिडिओत स्पष्ट आहे. आणि रिषभ पंत या व्हिडिओमध्ये नेमका पराभव कसा झाला?याची कारणे सांगताना दिसत आहे. पण ही कारणे संजीव गोयंका यांना पटत नाही.
हा सगळा मैदानातला ड्रामा पाहून अनेकांना केएल राहुलची आठवण झाली आहे.कारण केएल राहुल ज्यावेळेस लखनऊ सूपर जाएटसचा कर्णधार होता,त्यावेळेस देखील पराभवानंतर बाऊंन्ड्री लाईनवर त्याला फटकारले होते. या भांडणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.त्यामुळे संजीव गोयंका हे त्यांच्या कर्णधारांना नेहमीच झापतात असे मागचे हंगामात दिसले आहे. पण यंदा गोयंका यांची शिकार हा रिषभ पंत ठरला होता.त्यामुळे पंतचा आता व्हिडिओ व्हायरल होत आहे.
