महाराष्ट्राच्या तिन्ही खेळाडूंना 2.25 कोटी रुपये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टीमची उपकर्णधार स्मृती मानधना, तसेच खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा विशेष गौरव करण्यात आला. या तिन्ही खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रत्येकी सव्वा दोन कोटी रुपयेचा (2.25 कोटी रुपये) धनादेश, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. टीमच्या या ऐतिहासिक विजयामुळे केवळ देशाचाच नव्हे, तर महाराष्ट्राचाही नावलौकिक वाढला आहे. खेळाडूंना मिळालेला हा सन्मान राज्यातील इतर महिला खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.
advertisement
अमोल मुजुमदार यांना कितीचा धनादेश दिला?
या यशात खेळाडूंसह सपोर्ट स्टाफचे मोठे योगदान आहे, याची दखल घेत मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना साडे बावीस लाख रुपये (22.50 लाख रुपये) चा धनादेश प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर, गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी, पद्मश्री डायना एदलजी, ऍनालिस्ट अनिरुद्ध देशपांडे आणि लॉजिस्टिक सपोर्ट अपर्णा गंभीरराव यांच्यासह मिहिर उपाध्याय, पूर्वा काटे आणि ममता शिररुल्ला यांचाही सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री यांनी या सर्व सपोर्ट स्टाफला अतिरिक्त 11 लाख रुपये देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
दरम्यान, सुरूवातीच्या मॅचमध्ये पराभवानंतर पुन्हा संघाने कमबॅक केलं. कुठल्या ना कुठल्या मॅचमध्ये प्रत्येक खेळाडू चमकत होती. प्रत्येकाची महत्त्वाची भूमिका होती, असं फडणवीस म्हणाले. तुम्ही डेमोस्टिकमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. तुमची स्टोरी आम्ही सर्वांनी पाहिली. मी आत्ताच भाकित करतो की, तुमच्यावर येत्या काही दिवसात सिनेमा येणार, असं फडणवीस यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.
