काय म्हणाला मायकेल हसी?
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसी विनोदाने म्हणाला की, जर तो लहानपणापासून राष्ट्रीय संघासाठी खेळला असता तर त्याने सचिन तेंडुलकरपेक्षा 5000 जास्त धावा केल्या असत्या. हसीने वयाच्या 28 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्याच्या कारकिर्दीत त्याने 49 च्या सरासरीने 12,398 धावा केल्या.
सचिनला 5000 धावांनी मागे टाकलं असतं
advertisement
मायकेल हसी म्हणाला की, जर त्याला आधी संधी मिळाली असती तर तो सचिन तेंडुलकरला 5000 धावांनी मागे टाकू शकला असता. त्याने हे देखील कबूल केलं की त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला उशिरा सुरुवात झाल्यामुळे त्याच्या धावसंख्येचा आकडा वाढू शकला असता. मायकेल हसीने अलीकडेच 'द ग्रँड क्रिकेटर' यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.
सर्व फक्त एक स्वप्न होतं
मी याबद्दल खूप विचार केला आहे. मी कदाचित तेंडुलकरपेक्षा 5000 धावा पुढे असतो. सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके, सर्वाधिक विजय, सर्वाधिक अॅशेस विजय आणि कदाचित बहुतेक वर्ल्ड कप देखील, पण नंतर मला सकाळी उठल्यावर कळते की ते सर्व फक्त एक स्वप्न होतं, असं मायकेल हसी हसत हसत म्हणाला.
