TRENDING:

IND vs SA : 'तुम्ही पराभव Deserve करता', दिग्गज खेळाडूची भारतावर बोचरी टीका

Last Updated:

दरम्यान भारताच्या या पराभवानंतर त्यांच्यावर चौफेर टीका सूरू आहे.त्यात आता आणखी एका दिग्गजाने आता मोठं विधान केलं.तुम्ही पराभवच डिझर्व्ह करता अशाप्रकारची टीका दिग्गजाने केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs South Africa Test : साऊथ आफ्रिकेने अवध्या 30 धावांनी भारताचा पराभव केला आहे. या विजयानंतर साऊथ आफ्रिकेने 1-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे. दरम्यान भारताच्या या पराभवानंतर त्यांच्यावर चौफेर टीका सूरू आहे.त्यात आता आणखी एका दिग्गजाने आता मोठं विधान केलं.
team india
team india
advertisement

तुम्ही पराभवच डिझर्व्ह करता अशाप्रकारची टीका दिग्गजाने केली आहे. हा दिग्गज नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.

हा दिग्गज दुसरा तिसरा कुणी नसून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आहे. मायकल वॉनने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये त्याने भारताच्या पराभवावर मोठं विधान केलं आहे. अशी खेळपट्टी तयार करा आणि तुम्ही जागतिक कसोटी विजेत्या संघाविरुद्ध हरण्यास पात्र आहात,अशा शब्दात मायकल वॉन यांनी भारतावर टीका केली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने शानदार विजय अशा शब्दात त्यांचे कौतुक देखील केले आहे.

advertisement

भारताच्या दिग्गजाने लाईव्ह शोमध्ये सुनावलं

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याने लाईव्ह शो दरम्यान भारताच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. मी एका गोष्टीशी अजिबात सहमत नाही आहे.भारतीय संघ बदलाच्या काळात असताना भारतात पराभूत होते आहे,हे न पचणारं आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाऊन हरला आहे, इंग्लंडमध्ये जाऊन हारले कारण आम्ही संघ बदलाच्या काळात जातोय.त्यामुळे ही गोष्टी स्विकारता येईल,असे चेतेश्वर पुजाराने सांगितले.

advertisement

पण या संघात जो टॅलेंट आहे.तुम्ही सर्व खेळाडूंचा फर्स्ट क्लास रेकॉर्ड काढून बघा,यशस्वी जयस्वाल,केएल राहुल,शुभमन गिल या सगळ्यांचा फर्स्ट् क्लास रेकॉर्ड इतका चांगला आहे. आणि अशा परिस्थितीत जर आपण हारतोय तर नक्कीच काहीतरी गडबड आहे.हीच मॅच चांगल्या विकेटवर खेळले असते भारताला जिंकण्याची संधी होती. तुमच्या जिंकण्याचा टक्का कोणत्या विकेटवर जास्त आहे.अशा विकेटवर तुमचा टक्का कमी होतो. अशा विकेटवर प्रतिस्पर्धा बरोबरीत येतात.त्यामुळे तुम्ही चांगल्या विकेटवर खेळा,असे देखील पुजारा म्हणाला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दागिने नाही तर... पुणेकर या लाख मोलाच्या वस्तू मोफत पाहता येणार, कधी आणि कुठं?
सर्व पहा

भारताची ए टीम उभी करा ती पण साऊथ आफ्रिकेसमोर जिंकू शकते. कारण भारतात इतकं टॅलेंट आहे. त्यामुळे टॅलेंटची अजिबात कमी नाही आहे.भारत हा सामना हारली आहे हे न पचणार आहे,अशा शब्दात त्याने पुजाराने पराभवावर सतंप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : 'तुम्ही पराभव Deserve करता', दिग्गज खेळाडूची भारतावर बोचरी टीका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल