मोहम्मद शमीने निवडणूक अधिकाऱ्यांना त्याचा पासपोर्ट दाखवला आणि संपूर्ण प्रक्रिया सुमारे 15 मिनिटांत पूर्ण झाली. शमी हा रासबिहारी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कोलकाता महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 93 मध्ये नोंदणीकृत मतदार आहे.
आवश्यक SIR प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मोहम्मद शमी म्हणाला, 'मतदार यादीची पडताळणी करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या प्रक्रियेमुळे कोणाचेही नुकसान होत नाही आणि सर्वांनी सहकार्य करावे.'
advertisement
निवडणूक अधिकाऱ्यांनी शमीला त्याच्या पश्चिम बंगालमधील वास्तव्याबद्दल विचारले, तेव्हा शमीने स्पष्ट केले की तो गेल्या 25 वर्षांपासून कोलकातामध्ये राहत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांसोबत काम करताना आपल्याला कोणतीही अडचण आली नाही. जर त्यांनी मला पुन्हा बोलावले तर मी पुन्हा येईन, अशी प्रतिक्रिया शमीने दिली आहे.
निवडणूक आयोगाने यापूर्वी शमी आणि त्याचा भाऊ मोहम्मद कैफ यांना नोटीस बजावली होती. पण, शमी त्यावेळी राजकोटमध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळत होता आणि तो प्रक्रिया पूर्ण करू शकला नाही. त्यानंतर, निवडणूक आयोगाने मंगळवारची नवीन तारीख निश्चित केली. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला मोहम्मद शमी त्याच्या प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार लहान वयात कोलकात्याला गेला आणि तेव्हापासून तो तिथेच राहून क्रिकेट खेळत आहे.
