मोहम्मद शमी सध्या प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर असला तरी त्याच्या पर्सनल आयुष्यात मात्र अनेक चढउतार सुरू आहेत. मोहम्मद शमीची बायको हसीन जहां चांगली चर्चेत आहे. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अद्याप त्यांचा घटस्फोट झालेला नाही पण दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये मोहम्मद शमीनं केलेली कामगिरी पाहून बायकोचं मनं उफाळल्याचं दिसतंय. तिनं सोशल मीडियावर एका व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त केला आहे. मात्र त्यानंतर शमीच्या बायकोला चांगलंच ट्रोल करण्यात आलंय.
advertisement
मोहम्मद शमीची बायको हसीन जहां ही सोशल मीडियावर सक्रीय असते. तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘तेरे नाम से ही मुझको दुनिया वाले जानेंगे. तेरी सूरत देखकर ही लोग मुझे पहचानेंगे', या गाण्यावर तिनं लिप्सिंग व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओला तिला प्युअर लव्ह असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओमध्ये ती शेवटी लाजतानाही दिसतेय.
हसीन जहांचा हा व्हिडीओ पाहून मोहम्मद शमीच्या चाहत्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे. एका युझरनं लिहिलंय, "ज्याच्यावर बायकोचं दडपण नसतं तो खूप फास्ट बॉलिंग टाकतो, आता मोहम्मद शमीकडेच बघा". तर दुसऱ्या युझरनं लिहिलंय, ‘आता तुला खूप पश्चाताप होत असेल ना?’ तसंच आणखी एका युझरनं म्हटलंय, 'माझं प्रेम माझ्या नकाराचा बदला घेईल'.
दरम्यान काही दिवसांआधी हसीन जहांने एका मुलाखतीत तिनं शमीच्या चांगल्या खेळाबद्दल वक्तव्य केलं होतं. तिनं म्हटलं होतं की, "काहीही झालं तरी तो चांगला खेळतोय. चांगला खेळेला, टीममध्ये राहिल आणि चांगली कमाई करून आपलं भविष्य सुरक्षित करेल. मी टीम इंडियाला चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा देईन पण त्याला नाही".