एमएसने आम्हाला सांगितलं की...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, CSK च्या सीईओ यांनी महेंद्रसिंग धोनी आगामी आयपीएल 2026 मध्येही खेळताना दिसेल, याची पुष्टी केली आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की, "एमएसने आम्हाला सांगितलं आहे की तो पुढील सीझनसाठी उपलब्ध असेल." मागील आयपीएलमध्ये धोनी 'अनकॅप्ड' खेळाडू म्हणून खेळला होता आणि ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत त्याने टीमची कमान सांभाळली होती. अशातच आता थाला पुन्हा कॅप्टन म्हणून खेळणार की नुसता प्लेयर म्हणून खेळणार, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
पाच वेळा IPL चा किताब जिंकला
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने पाच वेळा IPL चा किताब जिंकला आहे. 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये त्यानी CSK ला विजेता बनवलं. याव्यतिरिक्त, धोनीच्या कॅप्टनसीमध्ये CSK ने 2010 आणि 2014 मध्ये चॅम्पियन्स लीग T20 चा किताबही पटकावला. CSK वर 2016 ते 2017 मध्ये बंदी असताना, धोनी रायझिंग पुणे सुपरजाएंट्ससाठी खेळला होता. CSK साठी खेळलेल्या 248 मॅचेसमध्ये धोनीने आतापर्यंत 4865 रन्स केले आहेत.
दरम्यान, धोनी आणि चेन्नई सुपर किंग्ज हे एक असे समीकरण आहे, जो IPL च्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि भावनिक खेळाड़ूंपैकी एक मानला जातो. CSK च्या प्रत्येक यशामध्ये आणि त्यांच्या 'येलो आर्मी' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फॅन बेसमध्ये धोनीचा सिंहाचा वाटा आहे. मॅचच्या कठीण परिस्थितीतही धोनी अचूक रणनीती आखतो आणि अनपेक्षित निर्णय घेऊन मॅचचा निकाल बदलतो. बॉलरला आणि फिल्डर्सना क्षणार्धात योग्य सूचना देणे, हे त्याच्या कॅप्टनसीचे वैशिष्ट्य आहे.
