लिसा किटली यांनी याआधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि जगभरातल्या वेगवेगळ्या लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून यशस्वी भूमिका बजावली आहे. लिसा यांचा हा अनुभव मुंबई इंडियन्सच्या महिला टीमला नक्कीच फायद्याचा ठरेल. मुंबई इंडियन्सची महिला टीम ही WPL च्या इतिहासातील सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबई इंडियन्सने WPL च्या तीन हंगामांपैकी 2023 आणि 2025 अशी दोन वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
advertisement
'लिसा किटली यांचं मुंबई इंडियन्सच्या कुटुंबामध्ये स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. लिसाने तिच्या कौशल्याने अनेक पिढ्यांना प्रेरित केलं आहे. तिचं आगमन मुंबई इंडियन्ससाठी नवीन अध्याय आहे, कारण आम्ही आणखी उंची गाठण्याचा आणि वारसा उभारण्याचा प्रयत्न करत आहोत', अशी प्रतिक्रिया नीता अंबानी यांनी दिली आहे.
'मुंबई इंडियन्समध्ये सामील होणं हा सन्मान आहे. या टीमने नवा मापदंड स्थापन केला आहे. मुंबई इंडियन्सचा उत्कृष्ट खेळ आणि त्यांच्या संस्कृतीची मी मनापासून कौतुक करते. हे यश द्विगुणीत करण्यासाठी मी मैदानात तसंच मैदानाबाहेर काम करण्यासाठी उत्सुक आहे', अशी प्रतिक्रिया लिसा किटली यांनी दिली आहे.
लिसा किटली यांना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या महिला टीमचं प्रशिक्षकपद भूषवण्याचा अनुभव आहे, तसंच त्या इंग्लंडच्या पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. लिसा यांनी WBBL, The Hundred आणि WPL मध्येही कोचिंगचा अनुभव आहे. लिसा यांनी काहीच दिवसांपूर्वी The Hundred मध्ये नॉर्दर्न सुपरचार्जर्सना विजेतेपद मिळवून दिले होते. लिसा किटली यांनी 9 टेस्ट, 82 वनडे आणि एका टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले.