TRENDING:

Ranji Trophy : आशिया कप सुरू असताना मोठी बातमी, मुंबईच्या 24 खेळाडूंमध्ये यशस्वीचं नाव नाही

Last Updated:

रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबईच्या 24 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या 24 सदस्यीय संघात यशस्वी जयस्वालचं नावंच नाही आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mumbai Ranji Trophy Squad 2025-26 : आशिया कप 2025 चा फायनल सामना हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या 28 सप्टेंबरला रंगणार आहे. या सामन्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबईच्या 24 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या 24 सदस्यीय संघात यशस्वी जयस्वालचं नावंच नाही आहे, त्यामुळे आश्चर्च व्यक्त होतं आहे. त्यामुळे जयस्वालला नेमकं वगळंल गेलं आहे की आणखी काय कारण आहे? हे जाणून घेऊयात.
yashasvi Jaiswal
yashasvi Jaiswal
advertisement

रणजी ट्रॉफी 2025-26 च्या हंगामासाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली आहे. शार्दुल ठाकूरच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.तसेच अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाचा राजीनामा देऊन सुद्धा त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या या 24 सदस्यीय संघात यशस्वी जयस्वालचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही आहे.त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

advertisement

स्पोर्टस तकच्या वृत्तानुसार यशस्वी जयस्वाल सध्या नेशनल ड्युटीवर असल्या कारणाने त्याला संघात स्थान न दिल्याचे बोलले जात आहे.त्यानंतर त्याला संघात समाविष्ट केले जाईल असे बोलले जात आहे. पण आशिया कपनंतर वेस्ट इंडिज विरूद्ध भारत टेस्ट मालिका खेळणार आहे.त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तो साऊथ आफ्रिकेविरूद्ध खेळणार आहे.त्यानंतर जुलैपर्यंत भारत एकही टेस्ट खेळणार नाही आहे. त्यामुळे जरी तो नेशनल ड्युटीवर असला तरी मधल्या काळात तो फ्री असणार आहे. या काळात त्याला मुंबईसाठी खेळता येणार आहे. त्यामुळे अशापरिस्थितीत किमान संभाव्य खेळाडूंमध्ये त्याने नाव असणे आवश्यक होते. पण त्याची संघात निवड न झाल्याने संस्पेन्स वाढला आहे.

advertisement

श्रेयसलाही संघात स्थान नाही

रेड-बॉल क्रिकेटमधून बाहेर पडण्याच्या अय्यरच्या अलिकडच्या निर्णयामुळे सर्व काही स्पष्ट झाले आहे. जरी तो व्हाईट-बॉल फॉरमॅटमध्ये मुंबईचे नेतृत्व करत असला तरी, लांब फॉरमॅटच्या मागण्या आणि त्याच्या स्वतःच्या प्राधान्यांमुळे तो सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे.

मुंबईचा संघ :

शार्दुल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, मुशीर खान, अंगक्रिश रघुवंशी, अखिल हेरवाडकर, अजिंक्य रहाणे, सर्फराज खान, सिद्धेश लाड, सुवेद पारकर, सूर्यांश शेडगे, आकाश पारकर, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसूझा, इरफान अक्खरा, प्रशंसनीय उम्मेद, प्रदीप अक्खरा, आकाश पारकर. (wk), हार्दिक तामोरे (wk), प्रसाद पवार (wk), शम्स मुलाणी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, अथर्व अंकोलेकर, आणि इशान मुलचंदानी.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : आशिया कप सुरू असताना मोठी बातमी, मुंबईच्या 24 खेळाडूंमध्ये यशस्वीचं नाव नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल