वेस्ट इंडिजचे हात गुंडाळले
अखेरच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला 28 धावांची गरज होती. नेपाळचा बॉलर डिपेन्दर सिंग याने अखेरच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजचे हात गुंडाळले. दुसऱ्या आणि तिसर्या बॉलवर फोर गेल्याने वेस्ट इंडिजच्या आशा उज्वलित झाल्या होत्या. त्यानंतर अखेरच्या तीन बॉलवर एकही रन न दिल्याने नेपाळला सहज विजय मिळवता आला आहे.
advertisement
कसा रंगला सामना?
नेपाळने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० ओव्हर्समध्ये ८ विकेट्स गमावून १४८ धावांचा सन्मानजनक स्कोर उभा केला. १२ धावांवर २ विकेट्स गमावल्यानंतर कर्णधार रोहित पौडेल (३८ धावा) आणि कुसल मल्ला (२० धावा) यांनी डाव सावरला. शेवटी गुलशन झा (२२) आणि दीपेंद्र सिंह (१७) यांच्या उपयुक्त योगदानाने संघाला १४८ पर्यंत मजल मारता आली. ४९ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा अनुभवहीन संघ २० ओव्हर्समध्ये ९ विकेट्स गमावून केवळ १२९ धावाच करू शकला. नवीन बिदाईसी (२२ धावा) वगळता वेस्ट इंडिजचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.
पुरस्कार देशातील शहीदांना समर्पित
दरम्यान, नेपाळच्या या विजयाचा नायक कर्णधार रोहित पौडेल होता, ज्याने ३८ धावांची शानदार खेळी केली. त्याला या डावासाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवप्रमाणेच रोहितनेही हा पुरस्कार आपल्या देशातील शहीदांना समर्पित केला. मी हा पुरस्कार आपल्या देशातील निषेधांमध्ये भाग घेतलेल्या शहीदांना समर्पित करू इच्छितो. गेल्या महिन्यातील काळ आमच्यासाठी चांगला गेला नाही, म्हणून जर आपण नेपाळच्या लोकांना थोडा आनंद देऊ शकलो तर ते खूप चांगले होईल असे मला वाटतं, असं रोहितने देखील म्हटलं आहे.