मॅट हेन्रीची टीममध्ये पुन्हा सरप्राईज एन्ट्री
सुपर 8 मध्ये जेव्हा इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात न्यूझीलंडला पराभव स्विकारावा लागला. त्यावेळी टीममध्ये लॉकी फर्ग्युसनची एन्ट्री झाली होती. अशातच आता आणखी एका खेळाडूने कमबॅक केलंय. सेमीफानयलच्या मॅचआधी कॅप्टन मिचेल सँटनर याने घोषणा केली की, स्टार वेगवान बॉलर मॅट हेन्री हा मंगळवारी रात्री उशिरा पोहोचणार आहे. सँटनरच्या या वक्तव्यामुळे आता साऊथ अफ्रिकेमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळातंय.
advertisement
मॅचमध्ये खेळणार की नाही?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी न्यूझीलंड संघासमोर खेळाडूंच्या निवडीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. मॅट हेन्री या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये खेळणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या मॅचनंतर हेन्री आपल्या दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी मायदेशी परतला होता, त्यामुळे या महत्त्वाच्या नॉकआऊट मॅचसाठी त्याच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अशातच त्याने कमबॅक केलंय. त्यामुळे तो खेळेल, अशीच अपेक्षा आहे.
नेत्रदीपक कामगिरी
दरम्यान, 34 वर्षीय मॅट हेन्रीने सुपर 8 स्टेजमध्ये श्रीलंकेविरुद्ध केवळ 2 ओव्हरमध्ये 3 रन्स देऊन 2 विकेट्स घेण्याची नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्याच्या या भेदक स्पेलमुळे न्यूझीलंडने 61 रन्सनी मोठा विजय मिळवला होता. आता अशा महत्त्वाच्या टप्प्यावर हेन्री मैदानावर उतरतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलं असून पूर्ण न्यूझीलंड संघ त्याच्या पुनरागमनाची आतुरतेनं वाट पाहत आहे.
