India vs Pakistan : एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत पाकिस्तानच्या लिंबूटींबू संघाने आयपीएल स्टार्सनी भरलेल्या भारतीय संघाचा 8 विकेटने पराभव केला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 136 धावा ठोकल्या होत्या. या धावांचा यशस्वी पाठलाग करत पाकिस्तानने हा सामना आठ विकेटस राखून जिंकला आहे. पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार माज सदाकत ठरला आहे.कारण त्याने 79 धावांची सर्वाधिक खेळी केली आहे.
advertisement
भारताने दिलेल्या 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सूरूवात चांगली झाली होती. पण नंतर मोहम्मद नईम 14 वर बाद झाला.त्याच्या पाठोपाठ यासिर खान 11 व र बाद झाला. पाकिस्तानचे एकामागून एक विकेट पडत असताना माज सदाकत एका बाजूने भारताचा डाव सावरून होता. यावेळी त्याने 79 धावांची सर्वाधिक खेळी करून पाकिस्तानला हा सामना 8 विकेटने जिंकून दिली होता.
टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली होती. यावेळी भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्याने डावाची सूरूवात चांगली केली होती. वैभव सूर्यवंशीने तर पहिल्या बॉलपासून प्रहार करायला सूरूवात केली होती. पण त्याचा साथिदार प्रियांश आर्या 10 धावांवर बाद झाला.त्याच्यानंतर मैदानात आलेल्या नमन धीरने ताबडतोड फलंदाजी केली. या दरम्यान तो 35 धावांवर बाद झाला.
त्याच्यानंतर वैभव मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती पण तो देखील 28 बॉलमध्ये 45 धावा करून बाद झाला. वैभव ज्यावेळेस बाद झाला त्यावेळेस भारत 9 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 91 वर खेळत होते. मात्र त्यानंतर भारताचा डाव गडगडला. आणि फक्त 45 धावात 7 विकेट गमावल्या. अशाप्रकारे भारताचा डाव 19 ओव्हरमध्ये 136 धावांवर ऑल आऊट झाला होता.
पाकिस्तानकडून शाहिद अजिजने 3, साद मसूदने आणि माज सदाकतने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. उबेद शाह, अहमद दनियाल आणि सुफियान मुकीमने प्रत्येकी 1 विकेट काढली होती. आता पाकिस्तानसमोर 137 धावांचे आव्हान होते.आता पाकिस्तान या धावा पूर्ण करून सामना जिंकते की भारत त्यांचा पराभव करतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान भारताच्या या अ संघात वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, नेहल वढेरा, नमन धीर, जितेश शर्मा रमणदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, सुयश शर्मा सारखे आयपीएल स्टार खेळाडू आहेत. या आयपीएस स्टार खेळाडूंनी पाकिस्तानसमोर माती खाल्ली आहे.
पाकिस्तान अ (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद नईम, माझ सदाकत, यासिर खान, मोहम्मद फैक, इरफान खान (कर्णधार), साद मसूद, गाझी घोरी (उप कर्णधार), शाहिद अजीज, उबेद शाह, अहमद दानियाल, सुफियान मुकीम
भारत अ (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, नेहल वढेरा, नमन धीर, जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकिपर), रमणदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, गुरजपनीत सिंग, सुयश शर्मा
