बॅटिंगमध्ये सुधारणेची गरज पण...
सलमान अली आगा म्हणाला, तुम्ही जर अशा मॅचेस जिंकत असाल, तर आम्ही एक 'स्पेशल टीम' (Special Team) असलो पाहिजे. सगळ्यांनी खूप चांगले प्रदर्शन केलं. त्याने बॅटिंगमध्ये सुधारणेची गरज असल्याचे मान्य केले. बॅटिंगमध्ये थोडी सुधारणा करणं आवश्यक आहे, पण आम्ही त्यावर नक्कीच काम करू, असं देखील सलमान अलीने म्हटलं आहे.
advertisement
...तर बऱ्याचदा मॅच जिंकू शकतो
बॉलिंग युनिटचे कौतुक करताना तो म्हणाला, आम्ही 15 रन्स कमी केल्या होत्या. पण, आम्ही ज्या प्रकारे सुरुवातीला बॉलिंग केली, त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांवर दबाव तयार झाला. आम्ही नवीन बॉलने चांगली बॉलिंग केली आणि तुम्ही जर अशी बॉलिंग केली, तर बऱ्याचदा मॅच जिंकू शकतो, असा विश्वास देखील त्याने यावेळी व्यक्त केला. त्यानंतर त्याने टीम इंडियाला वॉर्निंग दिली.
तुम्ही जर चांगली फील्डिंग करू शकत नसाल तर....
शाहीन एक 'स्पेशल प्लेयर' आहे. टीमला त्याच्याकडून जी अपेक्षा आहे, तेच तो करतो. त्याच्यासाठी मी खूप आनंदी आहे. आमची फील्डिंग चांगली होत आहे. शेन आमच्यावर खूप मेहनत घेत आहे. आम्ही एक्स्ट्रा सेशन्स करत आहोत. हेड कोच माईक हेसन यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, तुम्ही जर चांगली फील्डिंग करू शकत नसाल तर तुम्ही टीममध्ये नसाल, ज्यामुळे आमच्या फील्डिंगमध्ये सुधारणा झाली आहे, असंही सलमान म्हणाला.
आम्ही रविवारी परत येऊ - सलमान अली
दरम्यान, प्रतिस्पर्धी टीम इंडियाला इशारा देत सलमान म्हणाला की, "आम्ही कोणलाही हरवण्याइतकी चांगले टीम आहोत. आम्ही रविवारी परत येऊ आणि तेच करण्याचा प्रयत्न करू, असं म्हणत सलमानने पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये मस्त जोक मारला आहे. पाकिस्तानला फक्त 11 रन्सने विजय मिळवता आला आहे. त्यावरच पाकिस्तान मोठ्या उड्या मारताना दिसतंय. त्यामुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये हसमुख वातावरण पहायला मिळतंय.