TRENDING:

Pakistan vs Namibia : पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये उभी फूट! तीन खेळाडूंमुळे दोन गटात राडा, 'आफ्रिदी' गटाचा खेळाडू फुटला

Last Updated:

Pakistan vs Namibia : पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि शाबाद खान या तीन खेळाडूंना डच्चू देण्यात यावा, अशी चर्चा पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये होताना दिसत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pakistan vs Namibia : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तान आणि नामीबिया यांच्यात कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबवर अत्यंत महत्त्वाचा सामना रंगणार आहे. भारतीय संघाकडून मिळालेल्या 61 रन्सच्या मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तान संघात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पराभवामुळे खचलेल्या पाकिस्तानी गोटातून आता बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांसारख्या दिग्गज खेळाडूंना डच्चू दिला जाण्याची चर्चा रंगली असून क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Pakistan vs Namibia rift in dressing room
Pakistan vs Namibia rift in dressing room
advertisement

पाकिस्तान क्रिकेटमध्ये दोन गट 

पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि शाबाद खान या तीन खेळाडूंना डच्चू देण्यात यावा, अशी चर्चा पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये होताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोलंबोमधील प्रॅक्टिस दरम्यान पाकिस्तानचा कॅप्टन सलमान आगा आणि हेड कोच माईक हेसन यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी मतभेदावरून पाकिस्तान क्रिकेटमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे. या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांचा फॉर्म हाच होता.

advertisement

बाबर आणि शाहीनला बाहेरचा रस्ता?

सूत्रांच्या माहितीनुसार, अनुभवी खेळाडूंची खराब कामगिरी पाहता मॅनेजमेंट त्यांना बाहेर बसवण्याचा धाडसी निर्णय घेऊ शकते. शाहीन शाह आफ्रिदी गटातील खेळाडू आता सलमान अली आगा याला सपोर्ट करताना दिसत आहेत. सलग पराभवामुळे टीममधील वातावरण सध्या तणावपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. जर बाबर आणि शाहीन सारख्या मोठ्या नावांना ड्रॉप केले, तर त्याचा टीमच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. नामीबियाचा संघ या संधीचा फायदा घेऊन मोठा उलटफेर करण्याचा प्रयत्न करेल, यात शंका नाही.

advertisement

पाकिस्तानसाठी 'करो या मरो'

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
2 ट्रॅक्टर उंबराची भाजी,गव्हाच्या चपात्या,102 वर्षांची महाप्रसादाची अनोखी परंपरा
सर्व पहा

दरम्यान, ग्रुप-ए च्या पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तान सध्या 3 पैकी 2 मॅच जिंकून तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत या ग्रुपमधून आधीच सुपर-8 साठी पात्र ठरला असून, आता दुसऱ्या जागेसाठी युएसए आणि पाकिस्तान यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. जर पाकिस्तान हा सामना हारला, तर ते वर्ल्ड कपच्या शर्यतीतून थेट बाहेर होतील आणि युएसएसाठी सुपर-8 चे दरवाजे उघडले जातील. त्यामुळे हा सामना पाकिस्तानसाठी 'करो या मरो' असा ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pakistan vs Namibia : पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये उभी फूट! तीन खेळाडूंमुळे दोन गटात राडा, 'आफ्रिदी' गटाचा खेळाडू फुटला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल