नेमकं काय घडलं?
सध्या पाकिस्तानच्या विजयाची चर्चा कमी आणि त्यांच्या इंग्रजीची चर्चा जास्त सुरु आहे. अलीकडेच पाकिस्तानने 2011 नंतर ट्रॉफी जिंकली आहे, पाकिस्तानने हाँग काँग सिक्सेसचा किताब जिंकला आहे. या हाँगकाँग स्पर्धेत संघाचे भाषांतरकार म्हणून काम करणारे पीसीबीचे मीडिया जनरल मॅनेजर देखील इंग्लिश ट्रान्स्लेटर म्हणून काम करत आहेत. त्यांचे इंग्रजी ऐकून चाहत्यांना विश्वास बसत नाही. पाकिस्तानी खेळाडू आणि पीसीबीचे मीडिया जनरल मॅनेजर इंग्रजी बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
सामन्यात काय घडलं?
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सहा षटकांच्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 135 धावा केल्या. कर्णधार अब्बास आफ्रिदीने फक्त 11 चेंडूत 52 धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. अब्दुल समदनेही 13 चेंडूत पाच षटकार मारत 42 धावा केल्या. ख्वाजा नफयने सहा चेंडूत एकूण 22 धावांचे योगदान दिले.
कुवेतकडून मीत भावसारने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुवेतचा संघ फक्त 92 धावांवर बाद झाला. कुवेतकडून अदनान इद्रिस आणि मीत भावसार यांनी पहिल्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. इद्रिसने 8 चेंडूत 30 धावा केल्या आणि पाच षटकार मारले. तो डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक मूडमध्ये दिसत होता. भावसारने 12 चेंडूत एकूण 33 धावांचे योगदान दिले. त्याने त्याच्या डावात तीन चौकार आणि तीन षटकार मारले. परंतु हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर कुवेतचा डाव विखुरलेला दिसत होता आणि संघ फक्त 92 धावांवर आटोपला होता.
