32 वर्षांच्या हसनने त्याच्या साखरपुड्याची घोषणा सोशल मीडियावरून केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार पूजा लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारायलाही तयार झाली आहे. डावखुरा स्पिन बॉलर असलेला रझा हसनने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर पूजासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पूजा त्यांच्या साखरपुड्याची अंगठी दाखवत आहे.
समुद्र किनाऱ्यावर काढण्यात आलेल्या या फोटोंमध्ये रझाने लाल रंगाचा कुर्ता घातला आहे तर पूजा वाईन कलरच्या सूटमध्ये दिसत आहेत. रझाने डोळ्यावर गॉगलही लावला आहे. या फोटोमध्ये दोघं स्मीतहास्य करत असल्याचंही आणि रोमॅन्टिक पोज देत असल्याचंही दिसत आहे.
advertisement
'माझा साखरपुडा झाला आहे हे मला सांगताना आनंद होत आहे. मी माझ्या प्रेमाला संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्याबाबत विचरालं आणि तीही तयार झाली. नव्या प्रवासासाठी मी उत्साही आहे', असं हसन रझा त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे. यानंतर त्याने एन्गेज्ड आणि अवर जर्नी हा हॅशटॅगही वापरला आहे. पाकिस्तानी वेबसाईटच्या वृत्तानुसार रझा हसनच्या होणाऱ्या पत्नीचं नाव पूजा बोमन आहे आणि ती भारतामध्ये राहते.
पूजा धर्म बदलायला तयार
रझा हसन आणि पूजा पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लग्न करू शकतात. पूजा हिंदू आहे पण तिला इस्लाम धर्मामध्ये रस आहे, नवऱ्यासाठी ती धर्म बदलायलाही तयार आहे. रझा हसनने पाकिस्तानसाठी एक वनडे आणि 10 टी-20 मॅच खेळल्या आहेत. वनडेमध्ये त्याने 1 आणि टी-20 मध्ये 10 विकेटही घेतल्या आहेत. रझाने ऑक्टोबर 2014 साली वनडेमध्ये पदार्पण केलं आणि हिच त्याची शेवटची वनडेही होती.
