TRENDING:

Pakistan Cricket : पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर, सलमान आगासह खेळाडूंवर लावला 50 लाखांचा दंड! बावचळला 'ट्रॉफी चोर'

Last Updated:

Pakistani players fined Rs 50 lakhs : मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्ल्ड कप खेळणाऱ्या पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूवर 50 लाख पाकिस्तानी रुपये (सुमारे 16 लाख भारतीय रुपये) इतका मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pakistani players fined by PCB : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सर्वात हास्यास्पद कोणती टीम राहिली असेल तर ती म्हणजे पाकिस्तान... पाकिस्तान संघाला गेल्या काही वर्षात साडेसाती लागली आहे. लिंबूटिंबू संघासोबत पाकिस्तानला जिंकता येतंय पण मोठी टीम आली की पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळलं. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये देखील पाकिस्तानची तिच परिस्थिती पहायला मिळाली. मोठ्या नावांवर बाजूला ठेऊन पाकिस्तानने 'ब्रेक डान्स' करणारे खेळाडू आणले पण त्यांना विरोधी संघाच्या तालावर नाचावं लागलं. पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर झाली अन् आता खेळाडूंच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतलाय.
Pakistani players fined Rs 50 lakhs
Pakistani players fined Rs 50 lakhs
advertisement

प्रत्येक खेळाडूवर 50 लाखांचा दंड

टी-20 वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीचा फटका पाकिस्तानच्या खेळाडूंना आता आर्थिकदृष्ट्या बसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्ल्ड कप खेळणाऱ्या पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूवर 50 लाख पाकिस्तानी रुपये (सुमारे 16 लाख भारतीय रुपये) इतका मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. ही दंडाची रक्कम खेळाडूंच्या सॅलरी किंवा मॅच फीस मधून थेट कापली जाणार असून, पीसीबी स्वतः ही वसुली करणार आहे.

advertisement

बोर्डाने कडक पावलं उचलली

सलग चौथ्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानची टीम सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकली नाही, त्यामुळे बोर्डाने आता कडक पावलं उचलली आहेत. खराब कामगिरी केल्यास थेट आर्थिक नुकसान सोसावं लागेल, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला होता. पाकिस्तान क्रिकेटमध्ये यापूर्वीही कामगिरीवरून टीका झाली आहे, परंतु एवढ्या मोठ्या रकमेचा दंड लावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सर्वत्र याची चर्चा होत आहे.

advertisement

घरच्या मैदानासारखी परिस्थिती पण...

पाकिस्तानने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले होते, जिथं त्यांना घरच्या मैदानासारखी परिस्थिती उपलब्ध होती, तरीही त्यांना त्याचा फायदा उठवता आला नाही. सुरुवातीच्या मॅचमध्ये त्यांनी नेदरलँड्सवर 3 विकेट्स राखून विजय मिळवला, पण तो विजय मिळवतानाही त्यांची दमछाक झाली होती. मात्र, टीम इंडियाविरुद्ध झालेल्या महत्त्वाच्या मॅचमध्ये पाकिस्तानला 61 रन्सनी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

advertisement

अधिकृत घोषणा अद्याप नाही

दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या टीममधील कमकुवतपणा जगासमोर उघड केला. या मोठ्या पराभवानंतरही पाकिस्तानची टीम कशी बशी सुपर-8 मध्ये पोहोचली होती, पण तिथेही त्यांना आपला प्रभाव पाडता आला नाही आणि त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपला. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना धडा शिकवण्यासाठी असा निर्णय घेतला असावा, असं मानलं जातंय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याची अधिकृत घोषणा अद्याप केली नाही.

advertisement

पाकिस्तान होणार मालामाल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पिवळ्या सोन्यातून पैसा कमवायचा, तर पॉलिशिंग हवंच, हळद काढल्यावर काय करतात? पाहा
सर्व पहा

दरम्यान, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये ज्या संघाना सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाला नाही, ज्यांना सुपर 8 मधून बाहेर पडावं लागलं, अशा चार टीम्सला म्हणजेच पाकिस्तान, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि संभाव्य वेस्ट इंडीज यांना आयसीसीकडून समसमान रक्कम मिळणार आहे. सुपर 8 मधून बाहेर झालेल्या संघांना 3 लाख 80 हजार डॉलर्सची इनामी रक्कम आधीच पक्की झाली होती. त्यामुळे पाकिस्तानसह इतर तिन्ही टीम्सला देखील भारतीय रुपयांत सुमारे 3.50 कोटींच्या आसपास मिळतील.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pakistan Cricket : पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर, सलमान आगासह खेळाडूंवर लावला 50 लाखांचा दंड! बावचळला 'ट्रॉफी चोर'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल